मुंबई , 4 ऑक्टोबर : टीम इंडियाचा प्रमुख फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह या महिन्यात होणाऱ्या T20 वर्ल्ड कपमधून आऊट झालाय. बीसीसीआयनं सोमवारी याबाबतची अधिकृत घोषणा केली. भारतीय बॉलिंगचा हुकमी एक्का असलेला बुमराह स्पर्धेतून आऊट झाल्यानं टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. बुमराह बाहेर पडल्यानं त्याच्या जागेवर निवड होण्यासाठी मोहम्मद शमी किंवा मोहम्मद सिराज यांचा अशी माहिती समोर येत आहे. मात्र, हा निर्णय घेणं आधी वाटत होतं, तितकं सोपं असणार नाही. शमी चार स्टँडबाय खेळाडूंपैकी एक आहे. वर्ल्ड कपसाठी टीमची घोषणा झाल्यानंतर शमी कोरोनाग्रस्त झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेत तो खेळू शकला नाही. क्रिकबझच्या वृत्तानुसार, फिटनेस सिद्ध केल्यानंतरच शमीचा टीममध्ये समावेश केला जाऊ शकतो. शमीला वर्ल्ड कप टीममध्ये सहभागी करून घेण्याचा विचार करण्यापूर्वी त्याने किमान एक सामना तरी खेळावा, अशी राष्ट्रीय निवडकर्ते आणि टीम मॅनेजमेंटची इच्छा होती. पण आता हे शक्य नाही, त्यामुळे पुढे काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
इंदूर टी20ची तिकिटं 15 मिनिटातच संपली, पाहा किती आहे तिकिटांची किंमत? जसप्रीत बुमराहच्या जागी दुसरा पर्याय म्हणून मोहम्मद सिराजचं नाव पुढं आलं आहे. बुमराहच्या जागी त्याचा दक्षिण आफ्रिका T-20 सीरिजसाठी टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. सिराज मंगळवारी (4 ऑक्टोबर) इंदूरमध्ये होणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या T-20 मॅचमध्ये खेळण्यासाठी मैदानात उतरू शकतो. या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून भारताने विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे त्या विराट कोहली आणि के. एल. राहुल यांना शेवटच्या T-20 मॅचमध्ये विश्रांती दिली आहे. बेंचवर बसलेल्या खेळाडूंना संधी देण्याचा टीम मॅनेजमेंटचा विचार आहे. त्यामुळे शेवटच्या मॅचमधील प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक बदल होऊ शकतात.
वर्ल्ड कपआधी किंग कोहलीला आराम, तिसऱ्या टी20त होऊ शकतात हे मोठे बदल बुमराहच्या अनुपस्थितीमुळे ऑस्ट्रेलियातील भारताच्या खेळीवर नक्कीच परिणाम होईल, कारण डेथ ओव्हर्समधली बॉलिंग ही सध्या टीमसाठी सर्वांत मोठी चिंता आहे. बुमराहवर नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये उपचार सुरू असून बीसीसीआय त्याच्या मेडिकल रिपोर्टची वाट पाहत होतं, त्याचवेळी पुढील काही महिने तो क्रिकेट खेळू शकणार नाही हेही निश्चित झालं आहे.