मुंबई, 19 ऑक्टोबर : आयसीसी टी-20 वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेला ऑस्ट्रेलियात सुरूवात झाली. या स्पर्धेत एकूण 16 देशांतील क्रिकेट टीम सहभागी झाल्या आहेत.रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली खेळणारी टीम इंडिया या स्पर्धेच्या विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. भारतीय टीमनं नुकताच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या विरुद्धची सीरिजही जिंकलीय. त्यामुळे टीमचा आत्मविश्वास वाढला आहे. भारतीय टीम वर्ल्ड कप विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात असली, तरी भारताचे माजी वर्ल्ड कप विजेते कॅप्टन कपिल देव यांना असं वाटत नाही. टीम इंडियाची सुपर-फोरमध्ये जाण्याची शक्यता फक्त 30 टक्के इतकीच आहे, असा धक्कादायक दावा कपिल देव यांनी केला आहे. ‘टीव्ही 9 भारतवर्ष’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. काय म्हणाले कपिल देव? कपिल देव यांनी मंगळवारी (18 ऑक्टोबर) लखनऊमधील एका कार्यक्रमात सांगितलं की, टीम इंडियाची सुपर-फोरमध्ये जाण्याची शक्यता फार कमी आहे. ते म्हणाले, टटी-20 क्रिकेटमध्ये जी टीम आजची मॅच जिंकते तिच टीम पुढील मॅचमध्ये पराभूतही होऊ शकते. त्यामुळे भारताकडे वर्ल्ड कप जिंकण्याची कितपत संधी आहे, हे सांगणं फार कठीण आहे. आपली टीम टॉप-फोरमध्ये स्थान मिळवू शकेल का? या बद्दल मला शंका आहे. जर टीम इंडिया टॉप-फोरमध्ये गेली तर पुढील शक्यता वर्तवता येईल. माझ्या मते, भारताची सुपर-फोरमध्ये जाण्याची शक्यता 30 टक्के आहे." ब्रिस्बेनमध्ये पावसाचा खेळ; भारत-न्यूझीलंड सराव सामना रद्द, महामुकाबल्याचं काय होणार? कपिल देव यांच्या मते कोणत्याही टीममधील ऑलराउंडर खेळाडू महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. ते म्हणाले, “केवळ वर्ल्ड कपमध्येच नाही तर इतरही मॅचेस व स्पर्धांमध्येही विजय मिळवून देतील असे ऑलराउंडर तुमच्याकडे असणं फार महत्त्वाचं आहे. यापेक्षा चांगली बाब असूच शकत नाही. हार्दिक पंड्यासारखा खेळाडू टीमसाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो.” पुढे ते असेही म्हणाले, “कोणत्याही टीमसाठी ऑलराउंडर फार महत्त्वाचे असतात. त्यांच्यामुळे टीम मजबूत होते. पंड्यासारख्या ऑल राउंडरमुळे रोहित शर्माला सहावा बॉलर उपलब्ध होतो. याशिवाय पंड्या अप्रतिम बॅट्समन आणि फील्डरही आहे.” शाहीन आफ्रिदी फिट झाला पण सराव सामन्यात त्यानं ‘या’ खेळाडूचा पाय मोडला, पाहा Video दरम्यान, टीम इंडिया सध्या वॉर्मअप मॅचेस खेळत आहे. पहिल्या मॅचमध्ये भारताने यजमान ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. आज (19 ऑक्टोबर) न्यूझीलंड विरुद्ध भारताची दुसरी वॉर्मअप मॅच आहे. भारत 23 ऑक्टोबर रोजी मुख्य स्पर्धेतील आपली पहिली मॅच खेळणार आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्ध ही मॅच होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.