मुंबई, 9 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या टी- 20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेची दुसरी सेमी फायनल भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यात गुरुवारी होणार आहे. या अतिमहत्त्वाच्या मॅच आधी इंग्लंडच्या टीमला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा स्टार बॅटर डेव्हिड मलाननंतर आता फास्ट बॉलर मार्क वूडलाही दुखापत झाली आहे. मार्क वूड भारताविरुद्धच्या सेमी फायनल मॅचमध्ये खेळू शकणार की नाही याबाबत सस्पेन्स आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मार्क वूडची दुखापत गंभीर असून, त्याची खेळण्याची शक्यता फार कमी आहे. ‘आज तक’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
मंगळवारी (8 नोव्हेंबर) इंग्लंडच्या टीमसाठी ऑप्शनल प्रॅक्टिस सेशन ठेवण्यात आलं होतं. या वेळी मार्क वूड जखमी झाला आहे. या शिवाय, मार्क वूड आजारीदेखील आहे. इंग्लंड टीम व्यवस्थापनाने त्याच्या आजारी असण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मार्क वूडनं नुकतंच दुखापतीतून पुनरागमन केलं होतं. त्याच्या कोपराला दुखापत झाली होती. याच दुखापतीनं पुन्हा एकदा डोकं वर काढल्याची चर्चा आहे. या वर्ल्ड कपमध्ये वूडने 4 मॅचमध्ये 9 विकेट घेतल्या आहेत. भारताविरुद्धच्या सेमीफायनल मॅचमध्ये तो खेळू न शकल्यास त्याच्या जागी टायमल मिल्सला संधी मिळू शकते.
काही दिवसांपूर्वीच इंग्लंडच्या टीममधील डेव्हिड मलान जखमी झाला आहे. आयसीसी टी-20 क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या डेव्हिड मलानला श्रीलंकेविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये फिल्डिंग करताना दुखापत झाली होती. मलानने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत 55 मॅचमधील 53 इनिंगमध्ये एक हजार 748 रन्स केले आहेत. मलानच्या जागी फिल सॉल्टला टीममध्ये संधी मिळू शकते.
ऋषभ पंत की दिनेश कार्तिक? वाचा सेमी फायनलमध्ये रोहित कुणाला देणार संधी
दरम्यान, टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मादेखील नेट प्रॅक्टिस करताना जखमी झाला होता. त्याच्या उजव्या हाताला दुखापत झाली होती. या दुखापतीनंतर काही काळ त्याला प्रचंड वेदना होताना दिसल्या. टीमच्या फिजिओंनी त्याच्या दुखापतीची तपासणी केली होती. काही वेळाच रोहित शर्मा पुन्हा प्रॅक्टिस करताना दिसला. याचा अर्थ त्याची दुखापत फार गंभीर नाही.
भारतीय टीम: रोहित शर्मा (कॅप्टन), के. एल. राहुल (व्हाइस कॅप्टन), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
टीम इंडियाला फायनलमध्ये घेऊन जाणार हा बॉलर? प्रत्येक 11 बॉलनंतर घेतोय विकेट
स्टँडबाय खेळाडू: श्रेयस अय्यर, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर.
इंग्लंडची टीम: जोस बटलर (कॅप्टन), मोईन अली, अॅलेक्स हेल्स, हॅरी ब्रुक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल राशिद, फिल साल्ट, बेन स्टोक्स, टायमल मिल्स, डेव्हिड विली, क्रिस वोक्स आणि मार्क वूड.
स्टँडबाय खेळाडू: लियाम डॉसन आणि रिचर्ड ग्लिसन.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.