मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 वर्ल्ड कपच्या तोंडावर अफगाणिस्ताननं बदलला कॅप्टन, राशिदच्या जागी 'या' खेळाडूची नियुक्ती

T20 वर्ल्ड कपच्या तोंडावर अफगाणिस्ताननं बदलला कॅप्टन, राशिदच्या जागी 'या' खेळाडूची नियुक्ती

टी 20 वर्ल्ड कप तोंडावर  (ICC T20 World Cup 2021) आलेला असताना अफगाणिस्तानच्या टीममध्ये मोठी उलथापालथ सुरु आहे.

टी 20 वर्ल्ड कप तोंडावर (ICC T20 World Cup 2021) आलेला असताना अफगाणिस्तानच्या टीममध्ये मोठी उलथापालथ सुरु आहे.

टी 20 वर्ल्ड कप तोंडावर (ICC T20 World Cup 2021) आलेला असताना अफगाणिस्तानच्या टीममध्ये मोठी उलथापालथ सुरु आहे.

मुंबई, 10 सप्टेंबर : टी 20 वर्ल्ड कप तोंडावर  (ICC T20 World Cup 2021) आलेला असताना अफगाणिस्तानच्या टीममध्ये मोठी उलथापालथ सुरु आहे. या वर्ल्ड कपसाठी टीम जाहीर होताच राशिद खाननं  (Rashid Khan) कॅप्टनपदाचा राजीनामा दिला होता. सोशल मीडियावर एक मेसेज लिहित राशिदनं हा निर्णय जाहीर केला. राशिदनं राजीनामा दिल्यानंतर आता ऑल रांऊडर मोहम्मद नबीची  (Mohammad Nabi) कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

'इएसपीएन क्रिकइन्फो' नं दिलेल्या वृत्तानुसार मोहम्मद नबी आगामी वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तान टीमचा कॅप्टन असेल. नबीनं यापूर्वी देखील अफगाणिस्तानचे नेतृत्त्व केले आहे. यूएई आणि ओमानमध्ये 17 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपसाठी गुरुवारी अफगाणिस्तानची टीम जाहीर झाली. ही टीम जाहीर झाल्यानंतर काही वेळातच राशिद खाननं अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डावर (ACB) आरोप करत पदाचा राजीनामा दिला होता.

'कॅप्टन आणि देशाचा जबाबदार नागरिक या नात्यानं टीमच्या बैठकीमध्ये सहभागी होण्याचा मला पूर्ण अधिकार होता. निवड समिती आणि एसबीनं टीम निवताना माझं मत घेतलं नाही. त्यामुळे मी तातडीनं अफगाणिस्तानची कॅप्टनसी सोडत आहे. अफगाणिस्तानकडून खेळण्याचा मला कायम अभिमान असेल.' असं ट्विट राशिद खाननं केलं होतं.

IND vs ENG : विराट कोहलीच्या टीम इंडियाला 85 वर्षांचा इतिहास बदलण्याची संधी

अफगाणिस्तानची क्रिकेट टीम :  राशिद खान, रहमनुल्लाह गुरबाज, हजरतुल्लाह जजाई, उस्मान घानी, असगर अफगान, मोहम्मद नबी, नजीबुल्लाह जादरान, हशमतुल्लाह शाहिदी, मोहम्मद शहजाद, मुजीब उर रहमान, करीम जन्नत, गुलबदीन नईब, नवीन उल हक, हामिद हसन, शराफुद्दीन अशरफ, दौलत जादरान, शपूर जादरान आणि कायस अहमद

राखीव खेळाडू : अफसर जजई, फरीद अहमद मलिक

First published:
top videos

    Tags: Afghanistan, Cricket news