मँचेस्टर, 10 सप्टेंबर : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील पाचवी आणि सीरिजमधील शेवटची टेस्ट आजपासून मँचेस्टरमध्ये सुरु होत आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) टीम इंडियाला यंदा 14 वर्षांनी इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकण्याची संधी आहे. लॉर्ड्स आणि ओव्हल टेस्ट जिंकून टीम इंडिया या सीरिजमध्ये 2-1 नं आघाडीवर आहे. आता टीम इंडियाला मँचेस्टरमध्ये 85 वर्ष जुना इतिहास बदलण्याची संधी आहे.
मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात टीम इंडियानं आजवर एकही टेस्ट मॅच जिंकलेली नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यात या मैदानात एकूण 9 टेस्ट झाल्या आहेत. यापैकी चारमध्ये इंग्लंडनं विजय मिळवला असून 5 टेस्ट ड्रॉ झाल्या आहेत. भारतानं या मैदानात शेवटची टेस्ट मॅच 2014 साली खेळली होती. त्या टेस्टमध्ये इंग्लंडनं एक इनिंग आणि 54 रननं विजय मिळवला होता. याच मैदानात टीम इंडियासाठी आणखी एकत्र त्रासदायक आठवण आहे. भारतीय टीमनं 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये इथंच सेमी फायनल खेळली होती. त्यामध्ये न्यूझीलंडनं भारताचा पराभव केला होता. ती महेंद्रसिंह धोनीनं शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच ठरली.
रूट आणि वोक्सपासून सावधान!
इंग्लंडचा कॅप्टन जो रूट आणि फास्ट बॉलर ख्रिस वोक्सचा या मैदानात चांगला रेकॉर्ड आह. रूटनं इथं 8 टेस्टमध्ये 65 च्या सरासरीनं 781 रन काढले आहेत. इथं त्यानं एक द्विशतकही झळकावलं आहे. तर वोक्सनं 5 टेस्टमध्ये 23 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे मँचेस्टर टेस्टमध्ये टीम इंडियाला या दोघांपासून सावधान राहावं लागेल. त्याचबरोबर मोईन अलीनं 3 टेस्टमध्ये 16 विकेट्स घेतल्या आहेत.
IND vs ENG: मोठी बातमी! टीम इंडियात कोरोनाची भीती, सिनिअर खेळाडूचा खेळण्यास नकार
मँचेस्टर टेस्टमध्ये जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) विराट कोहली विश्रांती देण्याची शक्यता आहे. बुमराहनं या सीरिजमध्ये टीम इंडियाकडून सर्वात जास्त विकेट्स घेतल्या आहेत.
बुमराहनं या सीरिजमध्ये सर्वाधिक 151 ओव्हर बॉलिंग केली आहे. अन्य कोणत्याही बॉलरनं 130 ओव्हर बॉलिंग केलेली नाही. यामध्ये त्यानं 21 च्या सरासरीनं 18 विकेट्स घेतल्या आहेत. चौथ्या टेस्टमध्ये मोहम्मद शमी खेळला नव्हता. त्यामुळे पाचव्या टेस्टमध्ये बुमराहला विश्रांती देऊन शमीचा टीममध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. शमीनं या सीरिजमध्ये 11 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर लॉर्ड्स टेस्टमध्ये नाबाद 56 रनची महत्त्वपूर्ण भागिदारी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, India vs england