• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup Live Streaming: IND vs ENG पाहा कधी आणि कुठे पाहता येणार मॅच?

T20 World Cup Live Streaming: IND vs ENG पाहा कधी आणि कुठे पाहता येणार मॅच?

आयपीएल स्पर्धेनंतर दोनच दिवसांनी टी20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) सुरुवात झाली आहे. भारतीय फॅन्ससाठी आजचा दिवस (18 ऑक्टोबर) महत्त्वाचा आहे.

 • Share this:
  दुबई, 18 ऑक्टोबर: आयपीएल स्पर्धेनंतर (IPL 2021) दोनच दिवसांनी टी20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) सुरुवात झाली आहे. टी20 वर्ल्ड कपमधील पात्रता पहिल्याच मॅचमध्ये ओमाननं पपूआ न्यू गिनीचा (Oman vs Papua New Guinea) 10 विकेट्सनं पराभव केला. तर दुसऱ्या मॅचमध्ये स्कॉटलंडनं बांगलादेशला (Scotland vs Bangladesh) पराभवाचा धक्का दिला. भारतीय फॅन्ससाठी आजचा दिवस (18 ऑक्टोबर) महत्त्वाचा आहे. कारण, आजच्याच दिवशी भारतीय टीम या वर्ल्ड कपमधील पहिला सराव सामना खेळणार आहे. टीम इंडियाचा पहिला सराव सामना या वर्ल्ड कप विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या इंग्लंडशी (India vs England Warm-up Match) होणार आहे. टीम इंडियाचे सर्व खेळाडू नुकत्याच झालेली आयपीएल स्पर्धा खेळलेले आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच मॅच प्रॅक्टीस झाली आहे. पण, पाकिस्तान विरुद्ध 24 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पहिल्या मॅचमधील प्लेईंग 11 निश्चित करण्यासाठी या मॅचचा टीम मॅनेजमेंटला उपयोग होणार आहे. विशेषत: आयपीएल स्पर्धेत फॉर्मात नसलेल्या खेळाडूंवर मॅनेजमेंटचं विशेष लक्ष असेल. T20 World Cup Schedule: पाकिस्ताविरुद्धच नाही तर टीम इंडियाची प्रत्येक मॅच आहे खास, पाहा संपूर्ण वेळापत्रक किती वाजता सुरू होणार मॅच? भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील वॉर्म अप मॅच 18 ऑक्टोबर सोमवारी दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. India vs England मॅचचं Live प्रसारण कुठे? भारत विरुद्ध इंग्लंड मॅचचं लाईव्ह प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे. लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार? भारत विरुद्ध इंग्लंड मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवरही पाहता येणार आहे. जिओवरही पाहता येणार मॅच रिलायन्स जिओदेखील आपल्या ग्राहकांना आयपीएल मॅचची सुविधा देणार आहे. पोस्ट-पेड आणि प्री-पेड ग्राहकांना ही सुविधा मिळेल. जियोचे सगळे पोस्ट पेड ग्राहक टी20 वर्ल्ड कपमधील मॅच फ्रीमध्ये पाहता येतील. जिओ टीव्हीवर प्रेक्षकांना सर्व सामने पाहता येतील. IPL 2021 मधील फ्लॉप खेळाडूचा T20 World Cup मध्ये रेकॉर्ड, मलिंगाला टाकलं मागं भारतीय टीम: विराट कोहली (कॅप्टन) रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी इंग्लंड:  इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलिंग्स, जॉस बटलर, टॉम करन, ख्रिस जॉर्डन, लियम लिविंगस्टन, डेविड मलान, टेमाल मिल्स, आदिल रशीद, जेसन रॉय, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स आणि मार्क वूड
  Published by:News18 Desk
  First published: