• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup Schedule: पाकिस्ताविरुद्धच नाही तर टीम इंडियाची प्रत्येक मॅच आहे खास, पाहा संपूर्ण वेळापत्रक

T20 World Cup Schedule: पाकिस्ताविरुद्धच नाही तर टीम इंडियाची प्रत्येक मॅच आहे खास, पाहा संपूर्ण वेळापत्रक

आयपीएल स्पर्धा संपताच आता टी20 वर्ल्ड कपच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे. या वर्ल्ड कपमधील टीम इंडियाची पहिली लढत 24 ऑक्टोबरला पाकिस्तानशी (India vs Pakistan) होणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 17 ऑक्टोबर:  आयपीएल स्पर्धा संपताच आता टी20 वर्ल्ड कपच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे. या वर्ल्ड कपची पात्रता फेरी आजपासून (17 ऑक्टोबर) सुरू होणार आहे. पात्रता फेरीत एकूण 8 टीम खेळणार असून त्यांची दोन गटामध्ये विभागणी करण्यात आली आहे. A ग्रुपमध्ये आयर्लंड, नामिबिया, नेदरलँड आणि श्रीलंका या टीमचा समावेश आहे. तर बांगलादेश, ओमान, पापूआ न्यू गिनी आणि स्कॉटलंड या चार टीम B ग्रुपमध्ये आहेत. दोन्ही गटातील टॉप 2 टीम मुख्य फेरीसाठी पात्र होतील. मुख्य फेरीत टीम इंडियाचा ग्रृप 2 मध्ये समावेश आहे. या ग्रृपमध्ये पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान यासह पात्रता फेरीतील दोन्ही देशांचा यामध्ये समावेश आहे. टीम इंडियाची पहिली लढत 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध (India vs Pakistan) होणार आहे. या लढतीकडं संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष असेल. भारत-पाकिस्तान लढतीचा इतिहास हा संपूर्णपणे भारताच्या बाजूनं आहे. दोन्ही देशांमध्ये आजवर टी20 वर्ल्ड कपमध्ये 5 लढती झाल्या असून या सर्व भारतानं जिंकल्या आहेत. 2007 साली पाकिस्तानचाच फायनलमध्ये पराभव करुन टीम इंडियानं पहिल्या टी20 वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकावलं होतं. आता दुबईमध्ये होणाऱ्या या मॅचमध्ये हा इतिहास कायम ठेवण्याचा विराट कोहलीच्या (Virat Kohli) टीमचा प्रयत्न असेल. टीम इंडियाची दुसरी लढत 31 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडशी होणार आहे. भारतीय टीमला ग्रुपमध्ये टॉपवर राहण्यासाठी दुबईत होणारी ही लढत जिंकणे आवश्यक आहे. टीम इंडियाची तिसरी लढत 3 नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तान विरुद्ध अबू धाबीमध्ये होणार आहे. त्यानंतर पात्रता फेरीतील दोन विजयी टीम विरुद्ध 5 आणि 7 नोव्हेंबर रोजी दुबईत होणार आहे. T20 World Cup: सौरव गांगुलीनं टीम इंडियाला सांगितला चॅम्पियन होण्याचा मंत्र टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक 24 ऑक्टोबर- भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई, संध्याकाळी 7.30 वाजता 31 ऑक्टोबर- भारत विरुद्ध न्यूझीलंड,  दुबई, संध्याकाळी 7.30 वाजता 3 नोव्हेंबर- भारत विरुद्ध अफगाणिस्तान, अबू धाबी, संध्याकाळी 7.30 वाजता 5 नोव्हेंबर- भारत विरुद्ध ग्रुप-बी क्वालिफायर टॉप टीम,  दुबई, संध्याकाळी 7.30 वाजता 8 नोव्हेंबर- भारत विरुद्ध ग्रुप-ए क्वालिफायर दुसरी टीम,  दुबई, संध्याकाळी 7.30 वाजता 10 नोव्हेंबर- पहिली सेमी फायनल , अबू धाबी, संध्याकाळी 7.30 वाजता 11 नोव्हेंबर- दुसरी सेमी फायनल, अबू धाबी, संध्याकाळी 7.30 वाजता 14 नोव्हेंबर- फायनल,  दुबई, संध्याकाळी 7.30 वाजता
  Published by:News18 Desk
  First published: