मुंबई, 6 ऑगस्ट : आयपीएल स्पर्धा (IPL 2021) संपल्यानंतर लगेच 17 ऑक्टोबरपासून टी20 वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेत टीम इंडिया पहिली मॅच 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. या मॅचपूर्वी लेग स्पिनर वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) जखमी झाल्याचं वृत्त आहे. वरुण चक्रवर्तीला गुडघ्याची दुखापत झाली आहे. 10 ऑक्टोबरपर्यंत भारतीय टीममध्ये बदल केले जाऊ शकतात, त्याच्या जागी आयपीएल स्पर्धेत कमाल करणाऱ्या बॉलरला संधी मिळू शकते.
वरुण चक्रवर्ती दुखापतीमुळे टी20 वर्ल्ड कपच्या बाहेर गेला तर लेग स्पिनर युजवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) वर्ल्ड कप टीममध्ये संधी मिळू शकते. भारतामध्ये झालेल्या आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात चांगली कामगिरी करु न शकलेल्या चहलनं यूएई लेगमध्ये कमाल केली आहे. चहलनं या आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 12 मॅच खेळल्या असून त्यामध्ये 14 विकेट्स घेतल्या आहेत. यूएईमध्ये त्याची कामगिरी चांगली झालीय. याचा फायदा टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कपमध्ये होऊ शकतो.
बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयशी बोलताना वरुणच्या दुखापतीबाबत माहिती दिली. 'वरुणच्या गुडघ्याची अवस्था फार चांगली नाही, पण जर टी-20 वर्ल्ड कप नसता तर भारतीय टीमने त्याला खेळवण्याचा धोका पत्करला नसता. सध्या टी-20 वर्ल्ड कपवरच लक्ष आहे, यानंतर त्याच्या उपचारांबाबत विचार केला जाईल,' असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं. आयपीएल 2021 मध्ये वरुणने 13 मॅचमध्ये 6.73 च्या इकोनॉमी रेटने 15 विकेट घेतल्या आहेत.
IPL 2021 : हा बॉल पाहून तुम्हीही म्हणाल, चहल T20 World Cup मध्ये का नाही? VIDEO
केकेआरची मेडिकल टीम वरुण चक्रवर्तीचा फिटनेस कार्यक्रम तयार करत आहे. त्याला इंजक्शन दिली जात आहेत, त्यामुळे त्याला 4 ओव्हर टाकता येतील. या इंजक्शनमुळे दुखापतीतून दिलासा मिळतो. टीव्हीवर त्याला त्रास होत आहे, असं दिसत नाही, पण जेव्हा तो बॉलिंग करत नसतो तेव्हा त्याला त्रास होतो,' असं बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला.
IPL 2021: रोहित शर्माची अचूक चाल, T20 World Cup पूर्वी टीम इंडियाला Good News
टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम : विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी
राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, T20 world cup