मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: टीम इंडियात बदल होणार का? BCCI कडून आले मोठे अपडेट

T20 World Cup: टीम इंडियात बदल होणार का? BCCI कडून आले मोठे अपडेट

टी20 वर्ल्ड कपसाठी (ICC T20 World Cup 2021) टीममध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्याची शेवटची तारीख ही 10 ऑक्टोबर आहे. आयपीएल स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर टीम इंडियात बदल करण्यात येईल अशी चर्चा सुरू होती.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 10 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपसाठी (ICC T20 World Cup 2021) टीममध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्याची शेवटची तारीख ही 10 ऑक्टोबर आहे. बीसीसीआयनं (BCCI) आयपीएल स्पर्धेचा सेकंड हाफ (IPL 2021 Second Half) सुरू होण्यापूर्वी या स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केली होती. त्यानंतर आयपीएल स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर टीम इंडियात बदल करण्यात येईल अशी चर्चा सुरू होती. या सर्व विषयावर बीसीसीआयनं  स्पष्टीकरण दिलं आहे.

बीसीसीआयच्या सुत्रांनी न्यूज एजन्सी 'आयएनएनएस'ला दिलेल्या माहितीनुसार 17 ऑक्टोबर रोजी सुरू होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात कोणताही बदल होणार नाही. एखादा खेळाडू जखमी झाला तरच त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून नव्या खेळाडूचा समावेश होऊ शकतो.

यापूर्वी टीम बदलण्याच्या डेडलाईनपूर्वी  कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि व्हाईस कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यासोबत निवड समितीची एक बैठक होईल, असे वृत्त प्रकाशित झाले होते. मात्र अशा प्रकारची कोणतीही औपचारिक बैठक होणार नसल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी न्यूज एजन्सीला दिली आहे.

IPL मध्ये सर्वात फास्ट बॉल टाकण्याचं मिळालं गिफ्ट, ‘या’ बॉलरचा टीम इंडियात समावेश

निवड समितीनं 8 सप्टेंबर रोजी टीम इंडियाची घोषणा केली होती. या टीममध्ये युजवेंद्र चहल आणि शिखर धवन यांचा समावेश नसल्याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. त्याचबरोबर दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या श्रेयस अय्यरचा राखीव खेळाडूमध्ये समावेश करण्यात आला आहे. इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या शार्दुल ठाकूरचाही राखीव खेळाडू म्हणूनच टीममध्ये समावेश आहे.

टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्याचा फॉर्म आणि फिटनेसची सध्या टीम मॅनेजमेंटला सर्वाधिक चिंता आहे. पांड्यानं आयपीएलच्या दुसऱ्या हाफमध्ये एकही बॉल टाकलेला नाही. तसंच त्याची बॅटींगमधील कामगिरी देखील साधारण झाली आहे. पांड्याचा चौथा फास्ट बॉलर म्हणून टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. तो सध्या बॉलिंग करत नसल्यानं टीमचं संतुलन बिघडण्याची शक्यता आहे. पण बीसीसीसीआयनं दिलेल्या माहितीनुसार पांड्या टीममध्ये असेल, तसंच तो लवकरच नेटमध्ये बॉलिंग देखील सुरू करणार आहे.

हार्दिक पांड्या T20 वर्ल्ड कपमध्ये बॉलिंग करणार का? रोहितनं दिलं मोठं अपडेट

भारतीय टीम: विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी

राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर

First published:

Tags: Cricket news, T20 world cup, Team india