मुंबई, 11 ऑक्टोबर : टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) निवडण्यात आलेल्या टीम इंडियामध्ये बदल होण्याची चर्चा पून्हा एकदा सुरू झाली आहे. या टीममध्ये कोणताही बदल होणार नाही, असं बीसीसीआयनं काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. पण, ऑल राऊंडर हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) फिटनेसमुळे निवड समितीचं टेन्शन वाढलं आहे.
आयपीएल स्पर्धेच्या सेकंड हाफमध्ये हार्दिकनं एकही ओव्हर बॉलिंग केली नाही. हार्दिकच्या फिटनेसबाबत मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) याने केलेला खुलासा टीम इंडियाची काळजी वाढवणारा आहे. सनरायझर्स हैदराबादच्या (Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad) मॅचनंतर रोहितनं हे अपडेट दिले होते.
हार्दिक पांड्यानं अजून बॉलिंग सुरू केलेली नाही. फिजियो, ट्रेनर्स आणि मेडिकल टीम त्याच्यासोबत काम करत आहे. त्यानं आजवर एकही बॉल टाकला नाही, इतकंच मला माहिती आहे. आम्ही प्रत्येक मॅचनंतर त्याचा फिटनेसचा आढावा घेतला आहे. त्याच्यात दर दिवशी सुधारणा होत आहे. त्यामुळे आगामी आठवडाभरात तो बॉलिंग करण्यासाठी तयार होईल, अशी आशा आहे. पण, याबाबत अचूक माहिती डॉक्टर किंवा फिजियोच देऊ शकतात.' असं रोहितनं सांगितलं होतं.
रोहितच्या या स्पष्टीकरणानंतर आगामी वर्ल्ड कपमध्ये हार्दिक बॉलिंग करणार की फक्त बॅटर म्हणून खेळणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे टीम इंडियामध्ये आणखी एका फास्ट बॉलरचा समावेश करण्याबाबत निवड समितीमध्ये विचार सुरू आहे. टी20 वर्ल्ड कपसाठी टीम अंतिम करण्याची मुदत 15 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
T20 World Cup: अंपायरची चूक पकडली जाणार, ICC नं पहिल्यांदाच लागू केला नियम
बीसीसीआयच्या वरिष्ठ सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, 'टीम इंडियाच्या 15 सदस्यीय मुख्य टीममध्ये किमान एक फास्ट बॉलरची कमतरता आहे. आमच्याकडं शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर हे पर्या. आहे. शार्दुलनं स्वत:ला बॉलिंग ऑल राऊंडर म्हणून सिद्ध केलं आहे. तर दीपकनं श्रीलंका दौऱ्यात चांगली बॅटींग केली आहे.
इशान किशन करणार राहुलचा पत्ता कट! T20 वर्ल्ड कपसाठी विराटचा खास प्लॅन
हार्दिकनं बॉलिंग केली नाही तर निवड समिती या दोघांपैकी एकाचा समावेश करू शकते. त्याचबरोबर मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीच्या नावावरही निवड समिती चर्चा करू शकते. गुडघ्याच्या दुखापतीमुळे वरुणला वगळण्यात आले तर त्याच्या जागी युजवेंद्र चहल हा एकच पर्याय आहे,' असं या सूत्रांनी स्पष्ट केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Hardik pandya, T20 world cup