मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: अंपायरची चूक पकडली जाणार, ICC नं पहिल्यांदाच लागू केला नियम

T20 World Cup: अंपायरची चूक पकडली जाणार, ICC नं पहिल्यांदाच लागू केला नियम

यूएई आणि ओमानमध्ये 17 ऑक्टोबरपासून टी20 वर्ल्ड कप  (Men’s T20 World Cup 2021) सुरू होणार आहे. या वर्ल्ड कपसाठीची नियमावली आयसीसीनं (ICC) प्रसिद्ध केली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 10 ऑक्टोबर : यूएई आणि ओमानमध्ये 17 ऑक्टोबरपासून टी20 वर्ल्ड कप  (Men’s T20 World Cup 2021) सुरू होणार आहे. या वर्ल्ड कपसाठीची नियमावली आयसीसीनं (ICC) प्रसिद्ध केली आहे.यानुसार पुरुषाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच डीआरएसचा (DRS in T20 World Cup) वापर केला जाणार आहे. यापूर्वी 2016 साली भारतामध्ये झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये डीआरएसचा वापर करण्यात आला नव्हता. महिलांच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये 2018 पासून या पद्धतीचा वापर करण्यात येत  आहे.

काय आहेत नियम?

आयसीसीच्या नियमानुसार दोन्ही टीमना प्रत्येक इनिंगमध्ये जास्तीत जास्त 2 रिव्यू घेण्याची संधी मिळेल. याचा अर्थ दोन्ही इनिंगमध्ये फिल्ड अंपायरच्या निर्णयाला 2 वेळा आव्हान देण्याचा अधिकार टीमना असेल. रिव्यूनंतर टीव्ही अंपायरनं मैदानातील अंपायरचा निर्णय बदलला तर रिव्यू कायम राहील. मैदानातील खेळाडूच्या बाजूनं टीव्ही अंपायरनं निर्णय दिला नाही, तर टीम तो रिव्यू गमावेल.

आयसीसीच्या गर्व्हनिंग कौन्सिलनं कोरोना महामारीच्या काळात मैदानात अनुभवी अंपायरची अनुपस्थिती असल्यानं तिन्ही फॉर्मेटमध्ये एका रिव्यूची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार टी20 आणि वन-डेमध्ये दोन्ही टीमना एका इनिंगमध्ये 2 तर टेस्टमध्ये एका इनिंगमध्ये 3 अयशस्वी रिव्यू घेण्याची संधी आहे.

T20 क्रिकेटमध्ये आयर्लंडच्या खेळाडूची कमाल, विराट कोहलीला टाकलं मागं

'इएसपीएन क्रिकइन्फो' नं दिलेल्या वृत्तानुसार आयसीसीनं मॅच उशीरा सुरू झाल्यास किंवा पावसाचा अडथळा आल्यास किमान ओव्हर्सची (Minimum Over Rate Rule) संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रुप स्टेजच्या दरम्यान डकवर्थ लुईस मेथडनं मॅचचा निर्णय जाहीर करण्यासाठी दोन्ही टीमनं किमान 5 ओव्हर बॅटींग करणे आवश्यक आहे. तर सेमी फायनल आणि फायनलमध्ये किमान 10 ओव्हर्सची बॅटींग बंधनकारक करण्यात आली आहे. महिलांच्या मागील वर्षी झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्येही हा नियम लागू होता.

First published:

Tags: Icc, T20 world cup