मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /श्रीसंतनं शेअर केला हरभजनसोबतचा Photo, फॅन्सना आठवली 13 वर्षांपूर्वीची घटना

श्रीसंतनं शेअर केला हरभजनसोबतचा Photo, फॅन्सना आठवली 13 वर्षांपूर्वीची घटना

भारतीय क्रिकेटपटू एस. श्रीसंत (S. Sreesanth) सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो. श्रीसंतनं नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, हा फोटो पाहून सर्वांना आश्चर्य वाटलं.

भारतीय क्रिकेटपटू एस. श्रीसंत (S. Sreesanth) सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो. श्रीसंतनं नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, हा फोटो पाहून सर्वांना आश्चर्य वाटलं.

भारतीय क्रिकेटपटू एस. श्रीसंत (S. Sreesanth) सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो. श्रीसंतनं नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, हा फोटो पाहून सर्वांना आश्चर्य वाटलं.

मुंबई, 20 ऑक्टोबर: भारतीय क्रिकेटपटू एस. श्रीसंत (S. Sreesanth) सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो. श्रीसंत सध्या काय करतोय याचे अपडेट तो फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून सर्वांना देत असतो. श्रीसंतनं नुकताच एक फोटो शेअर केला आहे, हा फोटो पाहून सर्वांना आश्चर्य वाटलं. कारण, श्रीसंतनं त्याचा टीम इंडियामधील जुना सहकारी हरभजन सिंग (Harbhajan Singh) सोबतचा फोटो शेअर केला आहे.

हरभजनसोबत फोटो शेअर करत श्रीसंतनं लिहलं की, 'महान खेळाडू हरभजन सिंग सोबत. या अविस्मरणीय संध्याकाळसाठी खूप आभार. तुमच्यासाठी खूप खूप प्रेम आणि आदर भज्जी पा.'श्रीसंत आणि हरभजनसोबतचा फोटो पाहून फॅन्सना आयपीएल 2008 मधील घटना आठवली आहे. आयपीएल 2008 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या हरभजन सिंगनं किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणाऱ्या श्रीसंतला थप्पड लगावल्याचा आरोप झाला होता.

काय घडला होता प्रकार?

आयपीएल 2008 मध्ये झालेल्या एका लढतीमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबनं मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता. या मॅचमध्ये श्रीसंत पंजाबकडून तर हरभजन मुंबईकडून खेळत होता. या पराभवानंतर श्रीसंत हरभजनला काही तरी बोलता त्यानंतर रागानं हरभजननं त्याला थप्पड मारली. हरभजनला ही थप्पड चांगलीच महाग पडली. त्यामुळे त्याच्यावर काही मॅचची बंदी घालण्यात आली. तसंच त्याला 3.75 कोटींची रक्कम मिळाली नाही.

T20 World Cup : भारताला 2007 साली जिंकवणारे Champions सध्या काय करतायत?

श्रीसंतनं नंतर सचिन तेंडुलकरच्या मध्यस्थीमुळे आमच्यातील वाद मिटल्याचं सांगितलं होतं. मी हरभजनला भेटलो आणि नंतर आम्ही रात्री एकत्र डिनर देखील केलं, मात्र मीडियानं हा वाद वेगळ्याच स्तरावर नेला, असा आरोप श्रीसंतनं केला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बीसीसीआयनं नेमलेल्या नानावटी कमिशनसमोरही श्रीसंतनं हरभजनला शिक्षा न देण्याची मागणी केली होती.

भारत-पाकिस्तान एकतेचं प्रतीक बनली 'ही' टीम, दोन्ही देशांच्या फॅन्सना शिकवला मोठा धडा

आयपीएल 2013 मध्ये फिक्सिंग प्रकरणात श्रीसंतचा सहभाग उघड झाल्यानंतर त्याच्यावर बीसीसीआयनं बंदी घातली होती. ही बंदी संपल्यानंतर श्रीसंतनं यावर्षी केरळकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket news, Harbhajan singh, S sreesanth