मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup : भारताला 2007 साली जिंकवणारे Champions सध्या काय करतायत?

T20 World Cup : भारताला 2007 साली जिंकवणारे Champions सध्या काय करतायत?

टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World cup practice match) पहिल्या सराव सामन्यात भारताने इंग्लंडला धूळ चारली आहे. या वर्षी टीम इंडिया विश्वविजेता होणारच असा चाहत्यांना विश्वास आहे. 2007 साली पहिल्याच टी-20 विश्वचषकामध्ये महेंद्रसिंह धोनीच्या (T20 world cup 2007) नेतृत्वाखाली भारतीय टीमने विजेतेपद मिळवलं होतं.

टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World cup practice match) पहिल्या सराव सामन्यात भारताने इंग्लंडला धूळ चारली आहे. या वर्षी टीम इंडिया विश्वविजेता होणारच असा चाहत्यांना विश्वास आहे. 2007 साली पहिल्याच टी-20 विश्वचषकामध्ये महेंद्रसिंह धोनीच्या (T20 world cup 2007) नेतृत्वाखाली भारतीय टीमने विजेतेपद मिळवलं होतं.

टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World cup practice match) पहिल्या सराव सामन्यात भारताने इंग्लंडला धूळ चारली आहे. या वर्षी टीम इंडिया विश्वविजेता होणारच असा चाहत्यांना विश्वास आहे. 2007 साली पहिल्याच टी-20 विश्वचषकामध्ये महेंद्रसिंह धोनीच्या (T20 world cup 2007) नेतृत्वाखाली भारतीय टीमने विजेतेपद मिळवलं होतं.

पुढे वाचा ...

    मुंबई, 20 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World cup practice match) पहिल्या सराव सामन्यात भारताने इंग्लंडला धूळ चारली आहे. एकंदरीतच भारतीय टीमच्या खेळाडूंचा फॉर्म, आणि विजयी सलामी यामुळे या वर्षी टीम इंडिया विश्वविजेता होणारच असा चाहत्यांना विश्वास आहे. 2007 साली पहिल्याच टी-20 विश्वचषकामध्ये महेंद्रसिंह धोनीच्या (T20 world cup 2007) नेतृत्वाखाली भारतीय टीमने विजेतेपद मिळवलं होतं. 2007 चा वर्ल्डकप म्हटलं, की आजही सर्व क्रिकेट फॅन्सना लांब केस असणारा धोनी (Dhoni in 2007 world cup) आठवतो. सेमी फायनलमधील ऑस्ट्रेलियासोबतची मॅच आणि फायनलमध्ये पाकिस्तानचा उडवलेला धुव्वा, हा आजही चर्चेचा विषय ठरतो.

    या वर्ल्डकपच्या कित्येक आठवणी आहेत. युवराज सिंगने मारलेले सहा सिक्सर्स, श्रीशांत आणि मॅथ्यू हेडनमधलं टशन किंवा मग फायनलमध्ये मिसबाह उल हकची जोगिंदर शर्माने घेतलेली विकेट असो. अशा बऱ्याच गोष्टींमुळे हा विश्वचषक (T20 World cup) अगदी अविस्मरणीय असा होता. याचं श्रेय अर्थातच टीममधल्या प्रत्येक खेळाडूला जातं; पण मग तेव्हाच्या विश्वविजयाचे शिल्पकार आता कुठे आहेत? काय चाललंय त्यांच्या आयुष्यात? याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

    सुरुवात करू या विश्वविजेत्या टीमचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीपासून. कॅप्टन कूल (Captain Cool) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीने या विश्वचषकानंतर एकदिवसीय विश्वचषक आणि इतर कित्येक महत्त्वाच्या सीरिज भारताला जिंकून दिल्या. नुकतंच चेन्नई सुपर किंग्जने (CSK) धोनीच्या नेतृत्वाखाली आयपीएलमधलं चौथं विजेतेपद मिळवलं. तसंच, धोनी आता टी-20 वर्ल्डकपसाठी ‘विराट’सेनेला मार्गदर्शनही करणार आहे.

    धोनीनंतर 2007 चा वर्ल्ड कप कोणी गाजवला तर तो आहे युवराजसिंग. केवळ स्टुअर्ट ब्रॉडला मारलेले सहा सिक्सच (Yuvraj Singh six sixes) नाही, तर युवराजने जेव्हा टीमला गरज होती, तेव्हा तेव्हा आपल्या स्फोटक खेळीने डाव सावरला होता. यानंतर त्याच्या वैयक्तिक आयुष्यात कित्येक गोष्टी घडल्या. कॅन्सरवरही मात करून हा डावखुरा फलंदाज टीममध्ये पुनरागमनाचा प्रयत्न करत होता; मात्र त्याची सेकंड इनिंग तेवढी यशस्वी झाली नाही. अखेर 2019 मध्ये त्याने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

    भारतीय टीममधला ‘वाघ’ म्हणून ओळखला जाणारा वीरेंद्र सेहवागही 2007च्या विजयाचा शिल्पकार होता. वनडे आणि टेस्टमध्ये त्याचा फॉर्म त्या वेळी अगदी वाईट (Virendra Sehwag in 2007 T20 world cup) होता; मात्र त्याच्या स्फोटक शैलीमुळे त्याला टी-20 संघात स्थान देण्यात आलं होतं. हा वर्ल्ड कप सेहवागच्या करिअरला संजीवनी देणारा ठरला. यानंतर 2011च्या विश्वविजेत्या संघातही सेहवागचा मोलाचा वाटा राहिला. सेहवागही आता क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. सध्या तो समालोचक म्हणून काम करत असून, क्रिकेटशी जोडून राहिला आहे.

    या वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात नाबाद 75 धावा करणारा गंभीरही (Gautam Gambhir in 2007 T20 world cup) आता क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाइट रायडर्स संघानं (KKR) आयपीएल विजेतेपद मिळवलं. यानंतर त्याने समालोचक म्हणूनही उत्तम भूमिका पार पाडली. त्यानंतर त्याने राजकारणामध्ये प्रवेश केला. 2019 पासून तो लोकसभेचा खासदार म्हणून कार्यरत आहे.

    रॉबिन उथप्पाची (Robin Uthappa in 2007 T20 world cup) बॅट या विश्वचषकात तळपली ती शेवटचीच. त्यानंतर त्याच्या आंतरराष्ट्रीय करिअरला उतरती कळा लागली; मात्र आयपीएलने त्याला नवसंजीवनी दिली. त्यानंतर 2014 साली पुन्हा आंतरराष्ट्रीय संघात त्याला स्थान मिळालं होतं; मात्र आयपीएलमधला फॉर्म त्याला टिकवता आला नाही. सध्या उथप्पा केवळ स्थानिक क्रिकेट आणि आयपीएलमध्ये खेळतो. या वर्षी विजेत्या ठरलेल्या चेन्नईच्या संघातही तो होता.

    2007 साली झालेल्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात खालच्या क्रमांकाला येऊनही 16 बॉल्समध्ये 30 रन्स करणारा रोहित शर्मा (Rohit Sharma in 2007 T20 world cup) सर्वांच्याच लक्षात राहिला होता. यानंतरही रोहितचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील करिअर थोड्या धीम्या गतीनं जात राहिलं; मात्र आता रोहित भारतीय संघातला एक सर्वांत महत्त्वाचा आणि फॉर्ममध्ये असणारा खेळाडू आहे. या वर्षीच्या विश्वचषकातही रोहितच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

    दिनेश कार्तिकच्या (Dinesh Kartik) करिअरमध्ये मोठ्या प्रमाणात उतार-चढाव पहायला मिळाले. सध्या तो पूर्णपणे आयपीएलवर लक्ष केंद्रित करून आहे. या वर्षी कोलकाता टीमचा कॅप्टन म्हणून त्याची निवड करण्यात आली होती; मात्र मध्येच त्यानं कॅप्टनपद सोडलं. कार्तिकने निवृत्ती जाहीर केली नसली, तरी तो अधूनमधून समालोचनही करताना दिसून येतो.

    2007 चा वर्ल्डकप म्हटलं, की पठाण बंधूंची खेळीही आपल्याला आठवते. अंतिम सामन्यात इरफान पठाणने (Irfan Pathan) आफ्रिदीची घेतलेली विकेट असो किंवा युसूफ पठाणने (Yusuf Pathan) केलेली स्फोटक बॅटिंग असो. इरफान पठाण सध्या समालोचन करताना दिसून येतो. त्याने जम्मू-काश्मीरमधल्या कित्येक तरुणांना क्रिकेटचे धडेही दिले आहेत. युसूफ काही काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळत होता. 2011च्या विश्वविजेत्या संघातही तो होता. यानंतर कोलकाता आणि हैदराबादच्या आयपीएल संघांकडूनही तो खेळताना दिसला. सध्या तो सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे.

    अजित आगरकरची (Ajit Agarkar) 2007च्या विश्वचषकातली खेळी म्हणावी अशी लक्षात राहणारी नव्हती. यानंतर त्याने स्थानिक क्रिकेटवर लक्ष केंद्रित केलं. पुढे 2013मध्ये त्याने आपली निवृत्ती जाहीर केली. सध्या तो हिंदी आणि इंग्रजी समालोचक म्हणून उत्कृष्ट काम करतो. पीयूष चावलालाही त्या वर्ल्डकपमध्ये म्हणावी तशी संधी नाही मिळाली; मात्र त्या विश्वचषकामुळे त्याला पुढे बऱ्याच संधी मिळाल्या. त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द तेवढी चांगली राहिली नसली, तरी आयपीएलमध्ये त्याने उत्तम प्रदर्शन केलं. याच्या बळावर त्याला 2011च्या विजेत्या संघात स्थान मिळालं होतं. सध्या तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघामध्ये आहे.

    2007 च्या अंतिम सामन्यामध्ये चमकलेल्या जोगिंदरचा (Jogindar Sharma) तो खरं तर शेवटचाच आंतरराष्ट्रीय सामना ठरला. एकूण स्पर्धेमधली त्याची कामगिरी पाहता त्याला पुढे संघात स्थान मिळालं नाही. त्यानंतर त्याला चेन्नई सुपर किंग्जकडून आयपीएलमध्ये तीन वर्षं संधी देण्यात आली. पुढे हरियाणा पोलिस खात्यामध्ये नोकरीची संधी मिळाल्यानंतर जोगिंदरने क्रिकेटला रामराम ठोकला. सध्या जोगिंदर डेप्युटी सुपरिटेंडंट ऑफ पोलीस या पदावर कार्यरत आहे.

    कित्येक बॅट्समन्सना धडकी भरवणारा आर.पी. सिंग (RP Singh) हा त्या स्पर्धेमधला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक विकेट्स घेणारा बॉलर होता; मात्र या विश्वचषकानंतर त्याचा फॉर्म हरवल्यामुळे 2009मध्ये त्याला आंतरराष्ट्रीय संघातून वगळण्यात आलं. पुढे 2011 मध्ये त्याने कमबॅकचा प्रयत्न केला; मात्र पुढे त्याला आपला फॉर्म टिकवता आला नाही. नुकताच तो अबुधाबी टी-10 लीगमध्ये सहभागी झाला होता. तसंच, तो आता हिंदी समालोचक म्हणूनही काम करतो.

    भारताचा महत्त्वाचा बॉलर हरभजन सिंगनेही (Harbhajan Singh) त्या वर्ल्ड कपमध्ये तुफान कामगिरी केली होती. यानंतर 2011च्या वर्ल्ड कप विजयातही त्याचा मोठा वाटा होता; मात्र त्यानंतर त्याचा फॉर्म हरवल्यामुळे हरभजनला टीममधून वगळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर त्याने समालोचक आणि अॅनालिस्ट म्हणूनही काम केलं. सध्या तो कोलकाताच्या आयपीएल टीममधून खेळतो. दरम्यानच्या काळात त्याने काही रिअॅलिटी शो आणि एका चित्रपटातही काम केलं.

    हरभजन म्हटलं, की आपल्या डोळ्यांसमोर श्रीशांत (S. Sreesanth) येतोच. 2007च्या टीममधला एक महत्त्वाचा सदस्य असणारा हा वेगवान गोलंदाज 2011च्या विश्वविजेत्या संघातही होता; मात्र 2013 मधल्या फिक्सिंग स्कँडलमध्ये अडकल्यानंतर त्याला क्रिकेट खेळण्यावर बंदी घालण्यात आली. ही बंदी गेल्या वर्षी उठवण्यात आली; मात्र तरीही श्रीशांतला कुठेही कमबॅक करता आलं नाहीये. बंदीच्या काळात त्याने हिंदी बिग बॉस आणि साउथच्या काही सिनेमांमध्ये काम केलं होतं.

    First published:
    top videos

      Tags: T20 world cup