मुंबई, 20 ऑक्टोबर: भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) होणाऱ्या महामुकाबल्याकडं संपूर्ण क्रिकेट विश्नाचं लक्ष लागलं आहे. या निमित्तानं दोन्ही देशांच्या फॅन्समध्ये सोशल मीडियावर जोरदार शाब्दिक चकमक पाहयला मिळत आहे. यामध्ये अनेकदा फॅन्स पातळी सोडूनही एकमेकांवर टीका करतात. येत्या काही दिवसांमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानचा हा ज्वर आणखी वाढत जाणार आहे. भारत आणि पाकिस्तानच्या फॅन्समध्ये सोशल मीडिया वॉर रंगलेलं असतानाच या टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळणारी एक टीम मात्र दोन्ही देशांच्या एकतेचं प्रतीक बनली आहे. हा वर्ल्ड कप ज्या दोन देशांमध्ये सुरू आहे, त्यापैकी एक असलेली ओमानची टीम सध्या भारत-पाकिस्तान एकतेचं उदाहरण बनली आहे. ओमानच्या क्रिकेटपटूंचा जन्म हा भारत किंवा पाकिस्तानमध्ये झाला आहे. मंगळवारी बांगलादेश विरुद्ध खेळलेल्या मॅचमधील (Oman Vs Bangladesh) पाच क्रिकेटपटूंचा जन्म भारतामध्ये झाला असून सहा जणांचा पाकिस्तानमध्ये झाला आहे. ओमानच्या टीममधील जतिंदर सिंह (लूधीयाना), के प्रजापती (खेडा, गुजरात) संदीप गौड (हैदराबाद) आणि अयान खान (भोपाळ) या प्रमुख क्रिकेटपटूंचा जन्म भारतामध्ये झाला आहे. तर बिलाल खान (पेशावर), फयाज भट्ट (सियालकोट), मोहम्मद नदीम (सियालकोट), नसीन खुशी (सियालकोट) हे खेळाडू पाकिस्तानचे आहेत.
Who says Pakistanis & Indians can't work together. Birthplaces of today's Oman team:
— Saj Sadiq (@SajSadiqCricket) October 19, 2021
Sialkot
Ludhiana
Kheda, Gujarat
Chichawatni
Sialkot
Bhopal
Hyderabad, Andhra Pradesh
Sialkot
Gujranwala
Sialkot
Peshawar #T20WorldCup #BANvsOMAN
T20 वर्ल्ड कपमध्ये ओमान टी20 वर्ल्ड कपच्या हिल्याच सामन्यात ओमानने पपुआ न्यू गिनीला (Oman vs Papua New Guinea) धूळ चारली आहे. पपुआ न्यू गिनीने दिलेलं 130 रनचं आव्हान ओमानने 13.4 ओव्हरमध्येच एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. जतिंदर सिंगने (Jatinder Singh) 42 बॉलमध्ये नाबाद 73 रन केले, तर अकिब इलियास 43 बॉलमध्ये 50 रनवर नाबाद राहिला. T20 World Cup: KKR चं नुकसान केल्यानंतर मॉर्गनची दुटप्पी भूमिका, इंग्लंडला लावणार वेगळा न्याय बांगलादेश विरुद्ध बुधवारी झालेल्या मॅचमध्ये मात्र ओमानचा 26 रननं पराभव झाला. या मॅचमध्ये बांगलादेशनं पहिल्यांदा बॅटींग करताना सर्वबाद 153 रन केले. त्याचा पाठलाग करताना ओमाननं निर्धारित 20 ओव्हरमध्ये 9 आऊट 127 रन केले. ओमामची पात्रता फेरीतील शेवटची मॅच गुरुवारी स्कॉटलंड विरुद्ध होणार आहे. ही मॅच जिंकल्यास भारत-पाकिस्तान यांची एकत्र टीम असलेल्या ओमानला वर्ल्ड कपच्या मुख्य फेरीसाठी पात्र होण्याची संधी आहे.