मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: अफगाणिस्तान हरलं तर काय करणार... रविंद्र जडेजानं दिलं रोखठोक उत्तर! VIDEO

T20 World Cup: अफगाणिस्तान हरलं तर काय करणार... रविंद्र जडेजानं दिलं रोखठोक उत्तर! VIDEO

टीम इंडियाचा ऑल राऊंडर रविंद्र जडेजानं (Ravindra Jadeja) दमदार कामगिरी करत टीम इंडियाला स्कॉटलंड (India vs Scotland) विरुद्ध विजय मिळवून दिला.

टीम इंडियाचा ऑल राऊंडर रविंद्र जडेजानं (Ravindra Jadeja) दमदार कामगिरी करत टीम इंडियाला स्कॉटलंड (India vs Scotland) विरुद्ध विजय मिळवून दिला.

टीम इंडियाचा ऑल राऊंडर रविंद्र जडेजानं (Ravindra Jadeja) दमदार कामगिरी करत टीम इंडियाला स्कॉटलंड (India vs Scotland) विरुद्ध विजय मिळवून दिला.

  • Published by:  News18 Desk

दुबई, 6 नोव्हेंबर: टीम इंडियाचा ऑल राऊंडर रविंद्र जडेजानं (Ravindra Jadeja) दमदार कामगिरी करत टीम इंडियाला स्कॉटलंड (India vs Scotland) विरुद्ध विजय मिळवून दिला. जडेजानं फक्त 15 रन देत 3 विकेट्स घेतल्या. जडेजाच्या भेदक बॉलिंगमुळे स्कॉटलंडची टीम 85 रनवर ऑल आऊट झाली. त्यानंतर भारतीय क्रिकेट टीमनं 86 रनचं आव्हान फक्त 39 बॉलमध्ये पूर्ण केलं. जडेजाला त्याच्या कामगिरीबद्दल 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

टीम इंडियानं या स्पर्धेत (T20 World Cup 2021) जोरदार पुनरागमन केलं आहे. पण, अजूनही त्यांचा मार्ग सोपा नाही. अफगाणिस्ताननं रविवारच्या मॅचमध्ये न्यूझीलंडला पराभूत केलं तरच टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये जाण्याची शक्यता निर्माण होईल. अफगाणिस्ताननं न्यूझीलंडला हरवलं नाही तर काय करणार? असा प्रश्न शुक्रवारच्या पत्रकार परिषदेमध्ये  जडेजाला विचारण्यात आला. त्याला जडेजानं दिलेलं रोखठोक उत्तर आता व्हायरल झालं आहे.

अफगाणिस्तान रविवारी न्यूझीलंड विरुद्ध जिंकू शकलं नाही तर आम्ही बॅग पॅक करुन घरी जाणार, असं उत्तर जडेजानं या प्रश्नाला दिलं. जडेजाचं हे उत्तर सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे.

जडेजा फॉर्मात

जडेजानं टी20 इंटरनॅशनलमध्ये दुसऱ्यांदा एका इनिंगमध्ये 3 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं एकूण टी20 कारकिर्दीत 272 मॅचमध्ये 181 विकेट्स घेतल्या आहेत. एका इनिंगमध्ये 4 विकेट्स 3 वेळा आणि 5 विकेट्स 1 वेळा घेण्याची कामगिरी त्यानं केली आहे. त्यानं टेस्ट आणि वन-डे क्रिकेटमध्येही कमाल केली आहे. जडेजानं 56 टेस्टमध्ये 227 तर 166 वन-डेमध्ये 188 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं टेस्ट क्रिकेटमध्ये 2100 पेक्षा जास्त तर वन-डेमध्ये 2400 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल 2021 मध्ये (IPL 2021) चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) मिळवलेल्या विजयातही जडेजाचा मोलाचा वाटा होता.

IND vs SCO: टीम इंडियानं फक्त 39 बॉलमध्ये बदललं स्पर्धेचं चित्र, जाणून घ्या सेमी फायनलचं समीकरण

टी20 वर्ल्ड कपमध्ये 4 मॅचमध्ये 2 विजय आणि 2 पराभवांसह भारताच्या खात्यात 4 पॉईंट्स आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडिया तिसऱ्या क्रमांकावर आहे.

First published:

Tags: Afghanistan, Ravindra jadeja, T20 world cup