मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /अफगाणिस्तान क्रिकेटमधील पेच चिघळला, T20 वर्ल्ड कपसाठी टीम जाहीर होताच राशिद खानचा मोठा निर्णय

अफगाणिस्तान क्रिकेटमधील पेच चिघळला, T20 वर्ल्ड कपसाठी टीम जाहीर होताच राशिद खानचा मोठा निर्णय

तालिबाननं (Taliban) ताबा घेतल्यापासून अफगाणिस्तानमधील सर्व गोष्टी झपाट्यानं बिघडत चालल्या आहेत. T20 वर्ल्ड कपपूर्वी राशिद खाननं (Rashid Khan) घेतलेल्या निर्णयामुळे अफगाणिस्तानच्या क्रिकेट टीमला धक्का बसला आहे.

मुंबई, 10 सप्टेंबर : तालिबाननं (Taliban) ताबा घेतल्यापासून अफगाणिस्तानमधील सर्व गोष्टी झपाट्यानं बिघडत चालल्या आहेत. अफगाणिस्तानच्या क्रिकेट टीमनं (Afghanistan Cricket Team) गेल्या काही वर्षांमध्ये अत्यंत कष्टानं क्रिकेट विश्वात नाव कमावले. टेस्ट क्रिकेटचा दर्जा मिळवला. आता तालिबाननं महिलांना क्रिकेट खेळण्यास परवानगी नाकारल्यानं त्यांचा टेस्ट खेळण्याचा दर्जा रद्द होणार आहे. आता त्यापाठोपाठ टी20 वर्ल्ड कपपूर्वी (T20 World Cup 2021) अफगाणिस्तानच्या क्रिकेट टीमला मोठा धक्का बसला आहे.

टी 20 वर्ल्ड कपसाठी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं त्यांची टीम जाहीर केली. ही टीम जाहीर करताच काही तासांमध्ये राशिद खाननं (Rashid Khan) कॅप्टनसीचा राजीनामा दिला आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं टीम निवडीच्या बैठकीला आपल्याला बोलवालं नाही, कॅप्टन म्हणून कोणतंही मत न विचारता टीम जाहीर केली, असा आरोप करत राशिद खाननं तात्काळ कॅप्टनसीचा राजीनामा दिला आहे.

'कॅप्टन आणि देशाचा जबाबदार नागरिक या नात्यानं टीमच्या बैठकीमध्ये सहभागी होण्याचा मला पूर्ण अधिकार होता. निवड समिती आणि एसबीनं टीम निवताना माझं मत घेतलं नाही. त्यामुळे मी तातडीनं अफगाणिस्तानची कॅप्टनसी सोडत आहे. अफगाणिस्तानकडून खेळण्याचा मला कायम अभिमान असेल.' असं ट्विट राशिद खाननं केलं आहे.

अफगगाणिस्तानं टी 20 वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या टीममध्ये 6 बॉल आणि 4 ऑल राऊंडर्सचा समावेश आहे. या टीममध्ये राशिद खान, हजरतुल्लाह जजाई, मोहम्मद नबी, मोहम्मद शहजाद, मुजीब उर रहमान, कायस अहमद आणि नवीन उल हक या टी 20 स्पेशालिस्ट खेळाडूंचा समावेश केला आहे. तसंच या टीममध्ये दोन जणांना राखीव म्हणून निवडण्यात आलं आहे.

6,6,6,6,6,6! भारतीय खेळाडूनं एकाच ओव्हरमध्ये लगावले 6 सिक्स; 20 बॉलमध्ये काढले 112 रन्स, पाहा VIDEO

अफगाणिस्तानची क्रिकेट टीम :  राशिद खान, रहमनुल्लाह गुरबाज, हजरतुल्लाह जजाई, उस्मान घानी, असगर अफगान, मोहम्मद नबी, नजीबुल्लाह जादरान, हशमतुल्लाह शाहिदी, मोहम्मद शहजाद, मुजीब उर रहमान, करीम जन्नत, गुलबदीन नईब, नवीन उल हक, हामिद हसन, शराफुद्दीन अशरफ, दौलत जादरान, शपूर जादरान आणि कायस अहमद

First published:
top videos

    Tags: Afghanistan, Cricket news