मुंबई, 10 सप्टेंबर: वन-डे क्रिकेटमध्ये एकाच ओव्हरमध्ये सलग 6 सिक्स लगावण्याचा रेकॉर्ड यापूर्वी हर्षल गिब्जच्या (Herschelle Gibbs) नावावर होता. त्या रेकॉर्डची आता बरोबरी झाली आहे. भारतीय मूळ वंशाच्या जसकरण मल्होत्रानं (Jaskaran Malhotra) या विक्रमाची बरोबरी केली आहे. वन-डे क्रिकेटमध्ये एकाच ओव्हरमध्ये 6 सिक्स लगावणारा तो क्रिकेट विश्वातील दुसराच बॅट्समन बनला आहे. अमेरिकेकडून खेळणाऱ्या जसकरणनं पापूआ न्यू गिनीच्या विरुद्ध 50 व्या ओव्हरमध्ये हा विक्रम केला. गाऊडी टोकाच्या बॉलिंवर त्यानं हा विक्रम केला. त्यानं या मॅचमध्ये 16 सिक्स आणि 4 फोरच्या मदतीनं नाबाद 173 रन काढले. याचाच अर्थ त्यानं फक्त 20 बॉलमध्ये 112 रन काढले. 7 व्या मॅचमध्येच पराक्रम मुळचा पंजाबचा असणाऱ्या जसकरण मल्होत्राची ही फक्त 7 वी आंतरराष्ट्रीय वन-डे मॅच होती, 31 वर्षांच्या या बॅट्समनचा यापूर्वीच सर्वोच्च स्कोअर 18 रन होता. त्यानं या मॅचमध्ये वेगानं रन करत नवा विक्रम केला. त्यानं 124 बॉलमध्ये नाबाद 173 रन काढले. त्याच्या या खेळीमुळे अमेरिकेनं 9 आऊट 271 रन केले. पापूआ न्यू गिनीला हे आव्हान पेलवलं नाही. त्यांची संपूर्ण टीम 137 रनवर ऑल आऊट झाली. त्यामुळे अमेरिकेनं 134 रननं मोठा विजय मिळवला.
"There it is Sixes,
— Suvam Koirala 🏏 (@SuvamKoirala_45) September 9, 2021
Six of the best
He's hit 36 off the final over of the innings
Jaskaran Malhotra, Take a bow
One of the great ODI inning of all time " :@CricketBadge @usacricket @JaskaranUSA #jaskaranmalhotra #USAvPNG #ODI pic.twitter.com/S49bBUs1kq
भारताच्या खेळाडूंचे कोरोना रिपोर्ट आले, पाचव्या टेस्टची Update युवराजनंही केला आहे विक्रम जसकरण मल्होत्राच्यापूर्वी वन-डे क्रिकेटमध्ये हर्षल गिब्जनं हा विक्रम केला होता. त्यानं 2007 च्या वर्ल्ड कप दरम्यान नेदरलँड्स विरुद्ध एका ओव्हरमध्ये सहा सिक्स लगावले होते. भारताचा आक्रमक बॅट्समन युवराज सिंहनं 2007 साली झालेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये एकाच ओव्हरमध्ये सलग 6 सिक्स लगावले. इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉड विरुद्ध त्यानं ही खेळी केली होती. याच वर्षी मार्च महिन्यात वेस्ट इंडिजच्या कायरन पोलार्डनं श्रीलंकेच्या विरुद्ध टी20 मॅचमध्ये एकाच ओव्हरमध्ये 6 सिक्स लगावले होते.