• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup: टीम इंडियाला सेमी फायनलची अजूनही संधी, वाचा काय आहे समीकरण?

T20 World Cup: टीम इंडियाला सेमी फायनलची अजूनही संधी, वाचा काय आहे समीकरण?

पहिल्या मॅचमध्ये पाकिस्तान ( India vs Pakistan) आणि दुसऱ्या मॅचमध्ये न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्याकडून झालेल्या पराभवानंतर टीम इंडियानं टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) पुनरागमन केलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 4 नोव्हेंबर: पहिल्या मॅचमध्ये पाकिस्तान ( India vs Pakistan) आणि दुसऱ्या मॅचमध्ये न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्याकडून झालेल्या पराभवानंतर टीम इंडियानं टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) पुनरागमन केलं आहे. बुधवारी झालेल्या मॅचमध्ये भारतीय क्रिकेट टीमनं अफगाणिस्तानचा (India vs Afghanistan) 66 रननं मोठा पराभव केला. या विजयानंतर टीम इंडियाचा रनरेट निगेटीव्ह वरुन पॉझिटिव्ह (0.073) झाला आहे. त्यामुळे टीम इंडिया अजूनही सेमी फायनलच्या रेसमध्ये कायम आहे. काय आहे समीकरण? टीम इंडियाला आत्तापर्यंत 3 मॅचमध्ये 1 विजय मिळाला आहे. भारतीय टीमच्या अजून 2 मॅच बाकी आहेत. स्कॉटलंड आणि नामिबिया या टीमविरुद्ध या मॅच होणार असून त्यामध्ये टीम इंडियानं किमान 80 रननं विजय मिळवणे आवश्यक आहे. भारतीय टीमचं भवितव्य हे अफगाणिस्तानवरही अवलंबून आहे. अफगाणिस्ताननं न्यूझीलंडचा 53 पेक्षा कमी रननं पराभव केला तर टीम इंडियाची वाटचाल सोपी होईल. यापेक्षा मोठ्या रननं अफगाणिस्ताननं विजय मिळवला तर अफगाणिस्तानची टीम क्वालिफाय होईल. तर न्यूझीलंडनं अफगाणिस्तानचा पराभव केला तर ती टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करेल. टीम इंडियाला आता सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी नशिबाची साथ मिळणे देखील आवश्यक आहे. भारतीय टीमला लीगमधील शेवटची मॅच खेळायची आहे, ही चांगली बाब आहे. त्यामुळे शेवटच्या मॅचमध्ये नेमकं काय करायचं आहे, हे त्यांना माहिती असेल. अफगाणिस्तान विरुद्ध मोठा विजय भारताने दिलेल्या 211 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 144 रन करता आल्या. या विजयामुळे भारताच्या सेमी फायनलला पोहोचण्याच्या आशा अजूनही कायम आहेत. भारताकडून या सामन्यात मोहम्मद शमीला सर्वाधिक 3 विकेट मिळाल्या, तर आर अश्विनला 2 विकेट घेण्यात यश आलं. जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजालाही प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. अफगाणिस्तानकडून करीम जन्नतने 22 बॉलमध्ये नाबाद 42 आणि कर्णधार मोहम्मद नबीने सर्वाधिक 35 रन केले. विराटला साडेचार वर्षांनी कळाली अश्विनची 'किंमत', मॅच संपल्यावर म्हणाला... टीम इंडियाने पहिल्यांदा बॅटींग करताना  20 ओव्हरमध्ये तब्बल 210 रन केले. रोहित शर्मा 74 रन आणि केएल राहुल 69 रन करून आऊट झाले. या दोन्ही ओपनरनी 14.4 ओव्हरमध्ये 140 रनची पार्टनरशीप केली. यानंतर ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांनी अफगाणिस्तानच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. हार्दिक पांड्याने 13 बॉलमध्ये नाबाद 35 रन आणि ऋषभ पंतने 13 बॉलमध्ये नाबाद 27 रनची खेळी केली. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच एखाद्या टीमनं 200 रनचा टप्पा ओलांडला आहे.
  Published by:News18 Desk
  First published: