मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup: पाकिस्तानच्या मॅचमध्ये सानिया मिर्झावर निघाला फॅन्सचा राग, वाचा काय आहे प्रकरण

T20 World Cup: पाकिस्तानच्या मॅचमध्ये सानिया मिर्झावर निघाला फॅन्सचा राग, वाचा काय आहे प्रकरण

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) यांच्यात झालेल्या मॅचमध्ये सोशल मीडियावर भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाची (Sania Mirza) चर्चा होती. अनेकांनी तिच्यावर टीका देखील केली आहे.

मुंबई, 12 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात आलं आहे. गुरुवारी दुबईत झालेल्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा 5 विकेट्सनं (Australia vs Pakistan) पराभव केला. मॅथ्यू वेडने (Mathew Wade) 19 व्या ओव्हरमध्ये सलग 3 सिक्स लगावत पाकिस्तानच्या पराभवावर शिक्कामोर्तब केलं. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या मॅचमध्ये सोशल मीडियावर भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाची (Sania Mirza) चर्चा होती. अनेकांनी तिच्यावर टीका देखील केली आहे.

काय घडला प्रकार?

सेमी फायनलमधील मॅचमध्ये शादाब खाननं स्टिव्ह स्मिथला आऊट केल्यानंतर सानिया मिर्झानं उभं राहून टाळ्या वाजवल्या. सानिया पाकिस्तानला पाठिंबा देत टाळ्या वाजवत असल्याचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

सानिया मिर्झाच्या या कृतीवर ट्विटरवर काही जणांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. भारतीय व्यक्तीनं पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानं ही मंडळी नाराज झाली होती.

शेवटच्या दोन ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला (Australia vs Pakistan) विजयासाठी 22 रनची गरज होती, तेव्हा मॅथ्यू वेडने (Mathew Wade) शाहिन आफ्रिदीला लागोपाठ तीन सिक्स मारत एक ओव्हर शिल्लक असतानाच ऑस्ट्रेलियाला जिंकवलं. मॅथ्यू वेडने 17 बॉलमध्ये 41 रन केले, यामध्ये 4 सिक्स आणि 2 फोरचा समावेश होता. मार्कस स्टॉयनिसने (Marcus Stoinis) 31 बॉलमध्ये 40 रनची खेळी केली.

पाकिस्तानच्या पराभवाला जबाबदार कोण? बाबर आझमनं केला जाहीर इशारा

ऑस्ट्रेलियाची फायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध (Australia vs New Zealand Final) होणार आहे. ऑस्ट्रेलियाची टीम यापूर्वी 2010 साली फायनलमध्ये पोहचली होती. पण, त्यावेळी इंग्लंडनं त्यांना पराभूत केले होते. तर, न्यूझीलंडची टीम टी20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच फायनलमध्ये दाखल झाली आहे

First published:
top videos

    Tags: Australia, Pakistan, T20 world cup