दुबई, 12 नोव्हेंबर: पाकिस्तानचा टी20 वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये (T20 World Cup 2021 Semi Final) ऑस्ट्रेलियानं पराभव केला. या पराभवाबरोबरच त्यांच या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. सुपर 12 मधील 5 मॅच जिंकणाऱ्या पाकिस्तानला विजतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र त्यांना सेमी फायनलचा अडथळा पार करता आला नाही. या पराभवानंतर पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम देखील नाराज झाला. त्यानं ती नाराजी सार्वजनिकपणे बोलून दाखवली.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी पाकिस्तानला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी 10 ओव्हरमध्ये 71 रनची पार्टनरशीप केली. बाबर आझम 39 रन तर मोहम्मद रिझवान 67 रन करून आऊट झाले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने 2 विकेट घेतल्या, तर पॅट कमिन्स आणि अॅडम झम्पाला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
ऑस्ट्रेलियाला (Australia vs Pakistan) विजयासाठी 22 रनची गरज होती, तेव्हा मॅथ्यू वेडने (Mathew Wade) शाहिन आफ्रिदीला लागोपाठ तीन सिक्स मारत एक ओव्हर शिल्लक असतानाच ऑस्ट्रेलियाला जिंकवलं. मॅथ्यू वेडने 17 बॉलमध्ये 41 रन केले, यामध्ये 4 सिक्स आणि 2 फोरचा समावेश होता. मार्कस स्टॉयनिसने (Marcus Stoinis) 31 बॉलमध्ये 40 रनची खेळी केली. डेव्हिड वॉर्नरने 30 बॉलमध्ये 49 रन केले. पाकिस्तानकडून शादाब खानला 4 आणि शाहिन आफ्रिदीला 1 विकेट मिळाली.
पाकिस्तानने या मॅचवर आपली पकड मजबूत केली होती, पण 19 व्या ओव्हरला झालेली एक चूक त्यांना चांगलीच महागात पडली. या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलला मॅथ्यू वेडने सिक्स मारण्यासाठी मोठा शॉट खेळला, पण बाऊंड्री लाईनवर उभ्या असलेल्या हसन अलीने (Hasan Ali) त्याचा कॅच सोडला. या बॉलला मॅथ्यू वेडने दोन रन काढत पुन्हा स्ट्राईक घेतली. यानंतर पुढच्या तिन्ही बॉलला सिक्स मारत वेडने ऑस्ट्रेलियाला फायनलमध्ये पोहोचवलं.
T20 World Cup: ऑस्ट्रेलियानं 11 वर्षांनी केली पाकिस्तानची जखम ताजी, तोंडातून काढला विजयाचा घास
हसन अलीच्या या खराब फिल्डिंवर पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम (Babar Azam) चांगलाच नाराज झाला. हसननं सोडलेली कॅच हा मॅचचा टर्निंग पॉईंट होता, असं मत बाबरनं मॅच संपल्यानंतर बोलताना बाबरनं व्यक्त केलं. पाकिस्तानच्या फॅन्सच्या रागात बाबरच्या वक्तव्यानं तेल ओतलं. सोशल मीडियावर अनेकांनी हसन अलीवर जोरदार टीका केली. तसंच त्याबद्दलचे अनेक मीम देखील आता व्हायरल झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Australia, Pakistan, T20 world cup