मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 वर्ल्ड कप जिंकण्याची रणनीती 'या' हॉटेलमध्ये ठरणार, धोनीशी आहे खास कनेक्शन

T20 वर्ल्ड कप जिंकण्याची रणनीती 'या' हॉटेलमध्ये ठरणार, धोनीशी आहे खास कनेक्शन

भारतीय टीमनं 2013 नंतर एकदाही आयसीसीची स्पर्धा जिंकलेली नाही. तसंच विराट कोहलीची (Virat Kohli) टी20 टीमचा कॅप्टन म्हणून ही शेवटची स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेत आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे.

दुबई, 27 सप्टेंबर : आयपीएल स्पर्धा (IPL 2021) संपल्यानंतर 2 दिवसांनीच यूएई आणि ओमानमध्ये टी20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. टीम इंडियाची पहिली मॅच 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. भारतीय टीमनं 2013 नंतर एकदाही आयसीसीची स्पर्धा जिंकलेली नाही. तसंच विराट कोहलीची (Virat Kohli) टी20 टीमचा कॅप्टन म्हणून ही शेवटची स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेत आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे.

आगामी वर्ल्ड कपसाठी भारतीय सपोर्ट स्टाफ 2 ऑक्टोबर रोजी यूएईमध्ये दाखल होणार आहे. या सर्वांची दुबईतील 'द पाम' हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. याच हॉटेलमध्ये टीम इंडियाचा वर्ल्ड कप स्पर्धेतील मेंटॉर महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) याच्या चेन्नई सुपर किंग्स (CSK) टीमचा मुक्काम आहे.

भारतीय टीममधील वर्ल्ड कपसाठी निवड झालेले सर्व सदस्य आयपीएल फायनलनंतर एकत्र येणार आहेत. बीसीसीआयच्या सूत्रांनी न्यूज एजन्सी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण कोचिंग स्टाफ 2 ऑक्टोबर रोजी यूएईत दाखल होईल. त्यानंतर त्यांना 6 दिवस क्वारंटाईन राहावं लागेल. हा कालावधी संपल्यानंतर सर्व सपोर्ट स्टाफ टी20 वर्ल्ड कपसाठी तयार करण्यात आलेल्या बायो-बबलमध्ये प्रवेश करेल.

विराटच्या डोक्यात फक्त T20 World Cup चा विचार, मॅचनंतर जिंकली सर्वांची मनं

टी 20 वर्ल्ड कपला 17 ऑक्टोबरपासून पात्रता फेरीपासून सुरुवात होणार आहे. पहिली मॅच यजमान ओमान विरुद्ध पापूआ न्यू गिनी यांच्यात होणार आहे. 22 ऑक्टोबरपर्यंत हे सामने होतील. मुख्य स्पर्धेसाठी भारत, पाकिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान या 8 टीम थेट पात्र झाल्या असून अन्य चार टीम पात्रता फेरीच्या माध्यमातून दाखल होतील. मुख्य फेरीत खेळणाऱ्या 12 टीमची दोन गटामध्ये विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटात 6 टीम असतील. दोन्ही गटातील टॉप 2 टीम सेमी फायनलसाठी पात्र होतील.

महेंद्रसिंह धोनीची झोप उडवणारा 'हा' बॉलर ठरणार टीम इंडियाचं ट्रम्प कार्ड

भारतीय टीम: विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी

राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर

First published:

Tags: MS Dhoni, T20 world cup