मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021: महेंद्रसिंह धोनीची झोप उडवणारा 'हा' बॉलर ठरणार टीम इंडियाचं ट्रम्प कार्ड

IPL 2021: महेंद्रसिंह धोनीची झोप उडवणारा 'हा' बॉलर ठरणार टीम इंडियाचं ट्रम्प कार्ड

या आयपीएल सिझनमध्ये (IPL 2021) धोनीची (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्स (CSK) ही टीम चांगली कामगिरी करत आहे. सध्या ही टीम पॉईंट टेबलमध्ये टॉपवर आहे. असं असलं तरी एका भारतीय बॉलरनं सध्या धोनीची झोप उडवली आहे.

या आयपीएल सिझनमध्ये (IPL 2021) धोनीची (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्स (CSK) ही टीम चांगली कामगिरी करत आहे. सध्या ही टीम पॉईंट टेबलमध्ये टॉपवर आहे. असं असलं तरी एका भारतीय बॉलरनं सध्या धोनीची झोप उडवली आहे.

या आयपीएल सिझनमध्ये (IPL 2021) धोनीची (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्स (CSK) ही टीम चांगली कामगिरी करत आहे. सध्या ही टीम पॉईंट टेबलमध्ये टॉपवर आहे. असं असलं तरी एका भारतीय बॉलरनं सध्या धोनीची झोप उडवली आहे.

मुंबई, 27 सप्टेंबर : आयपीएल स्पर्धाच नाही तर संपूर्ण क्रिकेट विश्वात महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) बॅटींगचा दबदबा आहे.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला धोनी सध्या फक्त आयपीएल स्पर्धेत खेळतो. या आयपीएल सिझनमध्ये (IPL 2021) धोनीची चेन्नई सुपर किंग्स (CSK) ही टीम चांगली कामगिरी करत आहे. सध्या ही टीम पॉईंट टेबलमध्ये टॉपवर आहे. असं असलं तरी एका भारतीय बॉलरनं सध्या धोनीची झोप उडवली आहे.

कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) धोनीसाठी कोडं बनला आहे. रविवारी झालेल्या मॅचमध्ये वरुणनं धोनीला बोल्ड केलं. अशा पद्धतीनं तो धोनीला यूएईमध्ये सर्वात जास्त 3 वेळा बोल्ड करणारा बॉलर ठरला आहे. रविवारच्या मॅचमध्ये कोलकाताचा पराभव झाला. पण, वरुणनं 4 ओव्हर्समध्ये फक्त 23 रन देत 1 विकेट घेऊन सर्वांना प्रभावित केलं.

सीएसकेला केकेआर विरुद्ध शेवटच्या 3 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी 31 रन हवे होते. वरुण चक्रवर्तीनं 18 व्या ओव्हरध्ये फक्त 5 रन दिले आणि धोनीची विकेट घेतली. वरुणच्या लेंथ बॉलवर ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नात धोनी आऊट झाला. धोनी 4 बॉलमध्ये फक्त 1 रन काढून परतला. वरुणनं या आयपीएलमधील 10 मॅचमध्ये 11 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र त्याचा इकॉनॉमी रेट हा 6.92 इतका कमी आहे.

केकेआरला नमवत चेन्नई सुपर किंग्ज पुन्हा टॉपला; मोक्याच्या क्षणी रवींद्र जडेजाची जबरदस्त खेळी

वरुणनं गेल्या सिझनमध्येही धोनीला सतावलं होतं. केकेआरच्या विरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये धोनी 11 रन काढून वरुणच्या बॉलवर बोल्ड झाला होता. त्यानंतर 27 ऑक्टोबरला झालेल्या दुसऱ्या मॅचमध्ये वरुणनं पुन्हा धोनीला आऊट केलं. यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या लसिथ मलिंगानं धोनीला 2 वेळा बोल्ड केलं होतं. त्याचा रेकॉर्ड वरुणनं मागं टाकला आहे.

PURPLE CAP:

टी20 वर्ल्ड कपमध्ये ट्रम्प कार्ड

वरुण चक्रवर्तीची पुढील महिन्यात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात निवड झाली आहे. धोनीसारख्या अनुभवी खेळाडूला वारंवार चकवणाऱ्या वरुणच्या मिस्ट्री स्पिनकडून टीम इंडियाला मोठी अपेक्षा आहे. वरुणनं आजवर फक्त 3 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून त्यामध्ये 2 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये वरुणचा प्रतिस्पर्धी असलेला धोनी या वर्ल्ड कपमध्ये त्याचा मेंटॉर असेल.

First published:

Tags: IPL 2021, MS Dhoni, T20 world cup