मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup: धोनी ड्रेसिंग रूममध्ये परतल्यानंतर काय बदललं? राहुलनं दिलं उत्तर

T20 World Cup: धोनी ड्रेसिंग रूममध्ये परतल्यानंतर काय बदललं? राहुलनं दिलं उत्तर

टी20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) टीम इंडियाची घोषणा झाल्यानंतर मेंटॉर महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) सर्वात जास्त चर्चा आहे. दोन वर्षांनंतर भारतीय ड्रेसिंग रूममध्ये महेंद्रसिंह धोनीचं आगमन झालं आहे.

मुंबई, 20 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) टीम इंडियाची घोषणा झाल्यानंतर मेंटॉर महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) सर्वात जास्त चर्चा आहे. दोन वर्षांनंतर भारतीय ड्रेसिंग रूममध्ये महेंद्रसिंह धोनीचं आगमन झालं आहे. धोनी 2019 साली झालेल्या वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळला होता. त्यानंतर मागच्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर झाला.

टीम इंडियाची या वर्ल्ड कपमधील पहिली मॅच पाकिस्तान विरुद्ध (India vs Pakistan) रविवारी होणार आहे. या मॅचमध्ये रोहित शर्मासह (Rohit Sharma) केएल राहुल (KL Rahul) टीम इंडियाची ओपनिंग करणार हे नक्की आहे. इंग्लंड विरुद्ध झालेल्या वॉर्म अप मॅचमध्ये (India vs England) राहुलनं दमदार अर्धशतक झळकावलं आहे. राहुलनं एका कार्यक्रमात बोलताना महेंद्र सिंह धोनी आल्यानंतर टीममध्ये काय बदल झाला हे सांगितलं आहे.

'धोनी परत आल्यानं खूप चांगलं वाटलं, कारण आम्ही त्याच्या कॅप्टनसीमध्ये खेळलो आहोत. तो आमचा कॅप्टन होता तेव्हाही आम्ही त्याच्याकडं एक मेंटॉर म्हणून पाहात होतो.  त्याच्या उपस्थितीमुळे ड्रेसिंग रुममध्ये निर्माण होणारी शांतता आम्हाला आवडते. आम्ही पहिले दोन - तीन दिवस तो परतल्यानंतर पूर्ण आनंद घेतला. मी त्याच्याकडून कॅप्टनसी आणि क्रिकेटमधील प्रत्येक गोष्टीवर बारकाईनं शिकणार आहे.' असं राहुलनं स्पष्ट केलं.

धोनीशिवाय CSK ​​नाही अन् सीएसकेशिवाय धोनी नाही’, संघ मालकाचे मोठे भाष्य

धोनी सर्वात फिट

धोनीच्या कॅप्टनसीखाली चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यंदा चौथ्यांदा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. तो पुढच्या वर्षीही चेन्नईत घरच्या प्रेक्षकांसमोर आयपीएल स्पर्धेत खेळण्याची शक्यता आहे. त्यावर बोलताना राहुल म्हणावा की, 'आयपीएल फायनल ही धोनीची शेवटची मॅच होती की नाही, हे आमच्यापैकी कुणालाही माहिती नाही. धोनी आजही आम्हाला आव्हान देऊ शकतो. तो बॉलची जोरदार पिटाई करतो. तो सर्वात फिट आहे. विकेटमध्ये त्याच्यापेक्षा वेगानं पळणारं कुणीही नाही.' असं राहुल म्हणाला.

First published:
top videos

    Tags: Kl rahul, MS Dhoni, T20 world cup