जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / धोनीशिवाय CSK ​​नाही अन् सीएसकेशिवाय धोनी नाही’, संघ मालकाचे मोठे भाष्य

धोनीशिवाय CSK ​​नाही अन् सीएसकेशिवाय धोनी नाही’, संघ मालकाचे मोठे भाष्य

MS Dhoni

MS Dhoni

एमएस धोनीवर (MS Dhoni) सीएसके संघाचे मालक आणि व्यवस्थापकीय संचालक एन श्रीनिवासन भलतेच खुश झाले आहेत. धोनी शिवाय चेन्नई सुपर किंग्स संघाची कल्पना केली जाऊ शकत नाही, असे भावुक व्यक्तव्य त्यांनी केले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : आयपीएलमधील (IPL2021) मुंबई इंडियन्स नंतरचा सर्वात यशस्वी संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज ( Chennai Super Kings) होय. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाने आयपीएल स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. तर, एमएस धोनीवर (MS Dhoni) सीएसके संघाचे मालक आणि व्यवस्थापकीय संचालक एन श्रीनिवासन भलतेच खुश झाले आहेत. धोनी शिवाय चेन्नई सुपर किंग्स संघाची कल्पना केली जाऊ शकत नाही, असे भावुक व्यक्तव्य केले आहे. श्रीनिवासन यांनी आयपीएल ट्रॉफीसह भगवान वेंकटाचलापतीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “धोनी, सीएसके आणि तामिळनाडूचा महत्वाचा भाग आहे. धोनी शिवाय सीएसके नाहीये आणि सीएसके शिवाय धोनी नाहीये.” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. “धोनी शिवाय चेन्नई सुपर किंग्स संघाची कल्पना केली जाऊ शकत नसल्याचेही श्रीनिवासन यांनी म्हटले आहे. तसेच, बीसीसीआयच्या माजी अध्यक्षांनीदेखील श्रीनिवासन यांच्या वक्तव्याला समर्थन दर्शवले. T20 WC: कोच रवि शास्त्रींनी सांगितला प्लॅन; संघ निवडीबाबत म्हणाले…

अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाचा विजय

नुकताच आयपीएल 2021 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजय मिळवून चेन्नई सुपर किंग्स संघाने जेतेपदाचा चौकार मारला आहे. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर चेन्नई सुपर किंग्स संघाकडून फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक 83 तर ऋतुराज गायकवाडने 32 धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्स संघाला 20 षटक अखेर 192 धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून शुबमन गिलने 51 तर व्यंकटेश अय्यरने 50 धावांची खेळी केली. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने 27 धावांनी विजय मिळवला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: csk , ipl , IPL 2021 , MS Dhoni
  • First Published :
जाहिरात
जाहिरात