मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: अडचणीत सापडलेल्या हार्दिक पांड्याला आठवला धोनी! म्हणाला...

T20 World Cup: अडचणीत सापडलेल्या हार्दिक पांड्याला आठवला धोनी! म्हणाला...

टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) सध्या क्रिकेटमधील सर्वात खराब काळ सुरू आहे. सर्व बाजूंनी अडचणीत सापडलेल्या हार्दिकला टीम इंडियाचा मेंटॉर महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) आठवण झाली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 18 ऑक्टोबर: टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) सध्या क्रिकेटमधील सर्वात खराब काळ सुरू आहे. या आयपीएलमध्ये (IPL 2021) त्याची बॅट शांत होती. तसंच त्यानं यूएईमध्ये झालेल्या लेगमध्ये एकही ओव्हर बॉलिंग केली नाही. त्याच्या फिटनेसचा प्रश्न गंभीर असल्यानं त्यानं बॉलिंग केली नाही. त्यामुळे त्याची टीम इंडियातील जागा धोक्यात आली आहे. अडचणीत सापडलेल्या हार्दिकला टीम इंडियाचा मेंटॉर महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) आठवण आली आहे.

हार्दिकनं 'इएसपीएन क्रिकइन्फो' शी बोलताना धोनी हा मला भावासारखा असून माझ्या मनातील भावना समजणारा एकमेव व्यक्ती असल्याचं मत व्यक्त केलं आहे. पांड्यानं धोनीच्या कॅप्टनसीखालीच टीम इंडियात पदार्पण केले होते. धोनीनं यावेळी 2019 साली एका कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीनंतर अडचणीत सापडल्यावर धोनीनं केलेल्या मदतीचाही उल्लेख केला आहे.

'धोनी हा असा व्यक्ती आहे, जो मला सुरुवातीपासून चांगल्या पद्धतीनं ओळखतो. मी कसा आहे, मला काय आवडत नाही, हे सर्व त्याला माहिती आहे. 2019 साली माझ्यावरील बंदी हटल्यानंतर मला न्यूझीलंडला पाठवण्यात आले. त्यावेळी सुरुवातीला मला हॉटेलमध्ये रूम नव्हती. त्यावेळी मला धोनीनं रूमची व्यवस्था केल्याचा फोन आला. तो नेहमीच माझ्या मदतीसाठी तयार असतो.

T20 World Cup IND vs ENG: टीम इंडियाच्या 3 खेळाडूंची परीक्षा, चुकीला माफी नाही!

मी धोनीच्या खूप जवळचा आहे. मला तो शांत करु शकतो. माझ्याशी संबंधित मोठा वाद झाल्यानंतर मला त्याच्याच मदतीची गरज भासली. त्यानं करिअरमध्ये अनेकदा मला मदत केली आहे. तो मला भावासारखा आहे. मी त्याचा सन्मान करतो कारण त्यानं मला गरज होती, तेव्हा सर्वात जास्त मदत केली.

आमच्यात नेहमी चर्चा होते. मी नेहमी त्याच्याकडून सल्ला घेतो. त्याच्यासोबत राहून तुम्ही परिपक्व होता. तसंच नम्र राहण्यास शिकता. मी त्याला पाहून खूप काही शिकलो आहे. तो कधीही संयम सोडत नाही.' असं हार्दिकनं यावेळी सांगितलं.

IPL 2022: धोनी चेन्नईकडून खेळणार की नाही? नियमांमुळे वाढलं CSK चं टेन्शन

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज (सोमवारी) वॉर्म अप मॅच होणार आहे. या मॅचमध्ये हार्दिक कसा खेळ खेळतो, विशेषत: बॉलिंग करतो का? याकडं टीम मॅनेजमेंटचं लक्ष असेल. या मॅचमध्ये तो यशस्वी झाला नाही तर पाकिस्तान विरुद्ध शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) संधी मिळू शकते.

First published:

Tags: Cricket news, Hardik pandya, MS Dhoni