मुंबई, 18 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कप विजेतेपदाचा 14 वर्षांचा दुष्काळ संपवण्याच्या निर्धारानं टीम इंडिया यंदा स्पर्धेत (T20 World Cup 2021) उतरणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील वॉर्म-अप मॅचनं टीम इंडियाच्या तयारीला सुरुवात होणार आहे. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सोमवारी संध्याकाळी ही मॅच होणार आहे. या मॅचमध्ये भारतीय टीममधील काही खेळाडूंवर मॅनेजमेंटचं विशेष लक्ष असेल.
नुकत्याच संपलेल्या आयपीएल स्पर्धेत या खेळाडूंना फारशी कमाल करता आली नव्हती. आता पाकिस्तान विरुद्धची मॅच खेळण्यापूर्वी टीम मॅनेजमेंटचा विश्वास जिंकण्यासाठी त्यांना शेवटची संधी असणार आहे. या मॅचमध्येही त्यांनी निराशा केली तर पाकिस्तान विरुद्ध 24 ऑक्टोबरला होणाऱ्या मॅचमध्ये त्यांना प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळणार नाही.
हार्दिक पांड्या
टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या त्याच्या करिअरमधील सर्वात खराब फॉर्ममध्ये आहे. हार्दिकची बॅट सध्या शांत आहे. तसंच त्यानं फिटनेसच्या प्रश्नामुळे बॉलिंग देखील केलेली नाही. आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान त्याच्या निवडीवर वारंवार प्रश्न विचारण्यात आले. यूएईमधील लेगमध्ये अपयशी ठरलेल्या हार्दिकला इंग्लंड विरुद्ध मोठी संधी आहे. या मॅचमध्ये तो बॉलिंग करणार का? याकडंही सर्वांचं लक्ष असेल. हार्दिकची कामगिरी चांगली झाली नाही तर शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) संधी मिळू शकते. शार्दुलनं आयपीएल तसंच इंग्लंड दौऱ्यात दमदार कामगिरी केली आहे.
T20 World Cup: टीम इंडियाची आज समजणार ताकद, प्रत्येक खेळाडूवर असेल धोनीची नजर
आर. अश्विन
टीम इंडियाचा सर्वात अनुभवी स्पिनर आर. अश्विन (R. Ashwin) सध्या फॉर्मात नाही. अश्विननं 13 आयपीएल मॅचमध्ये फक्त 7 विकेट्स घेतल्या आहेत. अनेक मॅचमध्ये त्यानं बॉलिंगचा कोटाही पूर्ण केलेला नाही. अश्विनच्या टी20 कारकिर्दीसाठी हा वर्ल्ड कपही मोठी संधी आहे. या वर्ल्ड कपसाठी त्याचं चार वर्षांनी लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये आगमन झालं आहे. इंग्लंड विरुद्धच्या मॅचमध्ये अनुभवी अश्विननं कमाल केली नाही तर त्याची प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची आशा अंधुक होईल.
T20 World Cup: गेल्या 11 वर्षांपासून विराटला आहे 'या' रेकॉर्डची प्रतीक्षा, यंदा स्वप्न पूर्ण होणार?
भुवनेश्वर कुमार
आयपीएलच्या सेकंड हाफमध्ये भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) कमाल करता आली नाही. त्यामुळे त्याच्या इंग्लंड विरुद्धच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष आहे. टीम इंडियातडं जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे फास्ट बॉलर्स आहेत. भुवनेश्वरलाही प्लेईंग 11 मधील जागा नक्की करण्यासाठी इंग्लंडविरुद्ध जोरदार कामगिरी करावी लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs england, T20 world cup