मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup: गेल्या 11 वर्षांपासून विराटला आहे 'या' रेकॉर्डची प्रतीक्षा, यंदा स्वप्न पूर्ण होणार?

T20 World Cup: गेल्या 11 वर्षांपासून विराटला आहे 'या' रेकॉर्डची प्रतीक्षा, यंदा स्वप्न पूर्ण होणार?

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) हा सध्याच्या काळातील सर्वोत्तम बॅटर आहे. क्रिकेटमधील सर्व प्रकारात त्यानं सातत्यानं रन केले आहे. त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 23 हजारपेक्षा जास्त रन असून 70 सेंच्युरी आहेत.

पुढे वाचा ...

मुंबई, 18 ऑक्टोबर: टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) हा सध्याच्या काळातील सर्वोत्तम बॅटर आहे. क्रिकेटमधील सर्व प्रकारात त्यानं सातत्यानं रन केले आहे. त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 23 हजारपेक्षा जास्त रन असून 70 सेंच्युरी आहेत. विराटनं त्याच्या आजवरच्या कारकिर्दीमध्ये अनेक रेकॉर्ड केले असून सचिन तेंडुलकर ते डॉन ब्रॅडमन पर्यंत अनेकांच्या रेकॉर्ड्सना वेळोवेळी आव्हान दिलं आहे. मात्र, एक असा रेकॉर्ड आहे जो करण्यासाठी विराट गेल्या 11 वर्षांपासून प्रयत्न करत आहे.

विराटनं 2010 साली आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले.  गेल्या 11 वर्षात त्यानं 90 मॅच खेळल्या आहेत. या कालावधीत त्यानं 3159 रन काढले आहेत. जगातील कोणत्याही क्रिकेटपटूनं इतके रन काढलेले नाहीत. सर्वाधिक रन काढणाऱ्या विराटला अजूनही शतकाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे या टी20 वर्ल्ड कपमध्ये विराटची ही इच्छा पूर्ण होईल अशी फॅन्सना अपेक्षा आहे.

सर्वात जास्त अर्धशतक

विराटच्या नावावर टी20 क्रिकेटमध्ये अद्याप एकही आंतरराष्ट्रीय शतक नसलं तरी सर्वाधिक अर्धशतकांचा रेकॉर्ड त्याच्याच नावावर आहे. त्यानं आजवर एकूण 28 वेळा 50 रनचा टप्पा पार केला आहे. या यादीत रोहित शर्मा (Rohit Sharma)  दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर एकूण 22 अर्धशतक आहेत.

T20 World Cup: टीम इंडियाची आज समजणार ताकद, प्रत्येक खेळाडूवर असेल धोनीची नजर

3 वेळा संधी हुकली

विराटची आजवर तीन वेळा शतक झळकावण्याची संधी हुकली आहे. विशेष म्हणजे या तीन्ही वेळेस तो शतकाच्या जवळ येऊन नॉट आऊट राहिला आहे. जानेवारी 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अ‍ॅडलेडमध्ये त्यानं नाबाद 90 रन काढले होते. त्याचवर्षी झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये विराटनं वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद 89 रनची खेळी केली होती. त्यानंतर 2019 साली पुन्हा वेस्ट इंडिज विरुद्धच विराटला शतक झळकावण्याची संधी आली होती. त्यावेळी देखील त्याला 94 रनवर नाबाद राहावं लागलं.

T20 World Cup Live Streaming: IND vs ENG पाहा कधी आणि कुठे पाहता येणार मॅच?

टी20 क्रिकेटचा एकूण विचार केला तर विराटनं या प्रकारात आजवर एकूण 5 शतक झळकावली आहेत. त्यानं 2016 साली गुजरात लायन्स विरुद्ध फक्त 53 बॉलमध्ये शतक झळकावलं होतं. आता या वर्ल्ड कपमध्ये शतक झळकावून 11 वर्षांची प्रतीक्षाा संपवण्याचा विराटचा प्रयत्न असेल.

First published:
top videos

    Tags: T20 world cup, Virat kohli