मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

India vs Pakistan : इशान किशनच्या कुटुंबीयांसाठी मुलाच्या खेळण्यापेक्षा 'ही' गोष्ट महत्त्वाची

India vs Pakistan : इशान किशनच्या कुटुंबीयांसाठी मुलाच्या खेळण्यापेक्षा 'ही' गोष्ट महत्त्वाची

टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचची (India vs Pakistan Match) संपूर्ण देशात उत्सुकता आहे.  बिहारमधील क्रिकेट फॅन्सचं या मॅचकडं विशेष लक्ष आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 24 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचची (India vs Pakistan Match) संपूर्ण देशात उत्सुकता आहे.  बिहारमधील क्रिकेट फॅन्सचं या मॅचकडं विशेष लक्ष आहे, याचं एक मोठं कारण इशान किशन (Ishan Kishan) आहे. बिहारचा क्रिकेटपटू असलेल्या इशानची टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालीय. या निवडीनंतर इशानचे फॅन्स आणि त्याचे कुटुंबीय भलतेच उत्साहीत आहेत.

इशानच्या आई चित्रा सिंह यांनी यावेळी सांगितलं की, 'भारताकडून खेळण्यासाठी इशानचं लहानपणापासून स्वप्न होतं. वर्ल्ड कपमध्ये भारताची मॅच असेल तर तो जास्त उत्साही असे. इशानची वर्ल्ड कप टीममध्ये निवड झाली त्यावेळी आम्हाला काय वाटलं असेल याचा तुम्ही अंदाज करू शकता. आमच्यासाठी हे सर्व स्वप्न आहे. आमची नजर आता भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचवर आहे. भारतीय टीम ही मजबूत आहे. इशानला या मॅचमध्ये संधी मिळो अथवा न मिळो भारतानं कोणत्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानला हरवलं पाहिजे.

संधी मिळाली तर तो कमाल करेल!

भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचकडं इशानचे वडील प्रणव यांचंही लक्ष लागलं आहे. 'इशानला संधी मिळाली तर नक्की कमाल करेल. पण त्याला संधी मिळाली नाही तरी काही फरक पडत नाही. कारण टीम इंडियामध्ये निनड होणं हीच मोठी गोष्ट आहे. आम्ही वर्ल्ड कपच्या खूप मॅच पाहिल्या आहेत. पण आमच्या मुलाची वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणाऱ्या भारतीय टीममध्ये निवड झाली याचा विचार केला तरी ते एखादे स्वप्न वाटते.

India vs Pakistan: विजयी भव! वाराणसीमधील गंगा आरतीमध्ये टीम इंडियासाठी प्रार्थना

इशान किशनच्या करिअरमध्ये त्याची वहिनी डॉक्टर पल्लवी यांचंही योगदान आहे. त्या यावेळी म्हणाला की, 'इशानला पाकिस्तान विरुद्ध संधी मिळाली तर तो त्यांच्या बॉलर्सची धुलाई करेल. पण इशानला संधी मिळाली नाही तर भारतानं पाकिस्तानला पुन्हा एकदा पराभव केला पाहिजे हीच सर्वांची इच्छा आहे.'

First published:

Tags: India vs Pakistan, Ishan kishan, T20 world cup