• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup: 'आम्ही 6 महिने...' बुमराहनं सांगितली दमलेल्या टीम इंडियाची कहानी!

T20 World Cup: 'आम्ही 6 महिने...' बुमराहनं सांगितली दमलेल्या टीम इंडियाची कहानी!

न्यूझीलंड विरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचे खेळाडू थकलेले दिसत होते. टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) या मॅचनंतर बोलताना याचं कारण सांगितलं आहे.

 • Share this:
  दुबई, 1 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) टीम इंडियाचा सलग दुसरा पराभव झाला आहे. पाकिस्तानपाठोपाठ न्यूझीलंडनंही मोठा पराभव केल्यानं भारतीय क्रिकेट टीमचं या स्पर्धेतील आव्हान धोक्यात आलं आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचे खेळाडू थकलेले दिसत होते. टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) या मॅचनंतर बोलताना याचं कारण सांगितलं आहे. बुमराहनं या पराभवावर बोलताना कोरोनानंतर बदललेली परिस्थिती आणि क्रिकेटपटूंच्या मनस्थितीवर बायो-बबलमुळे होणारे परिणाम याकडं लक्ष वेधलं. कोरोनाच्या भीतीमुळे कोणताही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ स्पर्धा सुरु असताना बयो-बबलच्या बाहेर जाऊ शकत नाही. टीम इंडिया इंग्लंड दौरा, आयपीएल स्पर्धा आणि आता टी20 वर्ल्ड कप या सततच्या क्रिकेटमुळे सहा महिन्यांपासून बायो-बबलमध्ये आहे. बुमराह यावेळी म्हणाला की, 'तुम्हाला अनेकदा ब्रेकची गरज असते. तुम्ही तुमच्या कुटुंबीयांना मिस करता. सतत सहा महिने क्रिकेट खेळल्याचा परिणाम मनावर कुठेतरी होतोच. अनेक गोष्टी तुमच्या नियंत्रणात नसतात. कोण, कधी, कुणाविरुद्ध खेळणार याचा कार्यक्रम तयार केला जातो. त्यामुळे बबलमध्ये राहणे आणि कुटुंबापासून इतका कालावधी दूर राहण्याचा परिणाम मनावर होतो. बीसीसीआयनं त्यांच्या बाजूनं बरेच प्रयत्न केले. पण बबलमध्ये सतत राहिल्यानं खेळाडू मानसिकरित्या थकतात. एक खेळाडू म्हणून बराचसा वेळ मैदानात जातो. काही दिवस चांगले असतात. तर काही खूपच खराब असतात. या सर्व गोष्टी एका क्रिकेटरच्या आयुष्याचा भाग आहेत. त्यामुळे त्या चुकांपासून धडा घेत पुढील मॅचमध्ये सुधारणा केली पाहिजे.' असं बुमराहनं सांगितलं. IND vs NZ: टीम इंडियाला मोठ्या फरकानं कसं हरवलं? विल्यमसननं सांगितलं रहस्य कसं होतं टीम इंडियाचं वेळापत्रक? गेल्या वर्षी झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून टीम इंडिया सतत क्रिकेट खेळत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्याहून जानेवारी महिन्यात परतल्यानंतर 15 दिवसांमध्ये इंग्लडविरुद्धची सीरिज झाली. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात ही सीरिज खेळल्यानंतर भारतीय खेळाडू आयपीएल स्पर्धेत खेळले. मे महिन्यात कोरोना व्हायरसमुळे आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानं खेळाडूंना एक महिना ब्रेक मिळला. पण त्यानंतर टीम इंडिया तीन महिन्यांसाठी इंग्लंड दौऱ्याला रवाना झाली. इंग्लंड दौऱ्यानंतर लगेच यूएईमध्ये आयपीएल सिझनचा सेकंड हाफ पार पडला. त्यानंतर टीम इंडिया सध्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळत आहे.
  Published by:News18 Desk
  First published: