मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup : विराटला साडेचार वर्षांनी कळाली अश्विनची 'किंमत', मॅच संपल्यावर म्हणाला...

T20 World Cup : विराटला साडेचार वर्षांनी कळाली अश्विनची 'किंमत', मॅच संपल्यावर म्हणाला...

यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाला (Team India) पहिला विजय मिळवण्यात यश आलं आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध दारूण पराभव झाल्यानंतर भारताने अफगाणिस्तानचा 66 रनने पराभव केला. सामना संपल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) आर.अश्विनचं (R Ashwin)कौतुक केलं.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

अबु धाबी, 4 नोव्हेंबर : यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाला (Team India) पहिला विजय मिळवण्यात यश आलं आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध दारूण पराभव झाल्यानंतर भारताने अफगाणिस्तानचा 66 रनने पराभव केला. भारताने दिलेल्या 211 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने (India vs Afghanistan) 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 144 रन केले. भारताकडून मोहम्मद शमीला सर्वाधिक 3 विकेट मिळाल्या, तर आर.अश्विनला 2 विकेट घेण्यात यश आलं. जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

अफगाणिस्तानने टॉस जिंकून भारताला पहिले बॅटिंगला बोलावलं, यानंतर भारताने 20 ओव्हरमध्ये तब्बल 210 रन केले. रोहित शर्मा 74 रन आणि केएल राहुल 69 रन करून आऊट झाले. या दोन्ही ओपनरनी 14.4 ओव्हरमध्ये 140 रनची पार्टनरशीप केली. यानंतर ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांनी अफगाणिस्तानच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. हार्दिक पांड्याने 13 बॉलमध्ये नाबाद 35 रन आणि ऋषभ पंतने 13 बॉलमध्ये नाबाद 27 रनची खेळी केली. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच एखाद्या टीमला 200 रनचा टप्पा ओलांडता आला.

विराटने केलं अश्विनचं कौतुक

सामना संपल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) आर.अश्विनचं (R Ashwin)कौतुक केलं. आर.अश्विन फॉर्ममध्ये आल्याचं बघून आनंदी आहे, असं विराट म्हणाला. पण अश्विन कायमच फॉर्ममध्ये होता. टेस्ट क्रिकेट आणि आयपीएलमध्येही अश्विनने आपला फॉर्म कायम दाखवला, पण तरीही अश्विनला खेळण्याची संधी मिळत नव्हती. या टी-20 वर्ल्ड कपमधला अश्विनचा हा पहिलाच सामना होता. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचमध्ये मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीला खेळण्यात आलं, पण पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये वरुणची मिस्ट्री दिसली नाही, त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्ध अश्विनला मैदानात उतरवण्यात आलं.

अश्विनने त्याच्या 4 ओव्हरमध्ये फक्त 14 रन देऊन 2 विकेट घेतल्या. अश्विनचं टीममध्ये पुनरागमन ही सगळ्यात मोठी सकारात्मक गोष्ट आहे. आयपीएलमध्येही तो चांगला खेळत असल्याचं आपण पाहिलं. तो जेव्हा अशी कामगिरी करतो तेव्हा आम्ही मधल्या ओव्हरमध्ये खेळावर ताबा मिळवतो. आजच्या सामन्यानंतर माझ्यासाठी ही सगळ्यात जास्त दिलासा देणारी गोष्ट आहे, असं विराट म्हणाला. आर.अश्विनचं भारताच्या मर्यादित ओव्हरच्या टीममध्ये तब्बल साडेचार वर्षांनी पुनरागमन झालं आहे. 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर अश्विनला टीममधून डच्चू देण्यात आला.

First published:

Tags: R ashwin, T20 world cup, Team india, Virat kohli