मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: टी20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियासाठी Good News, विराटचा 'हा' सहकारी जबरदस्त फॉर्मात

IPL 2021: टी20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियासाठी Good News, विराटचा 'हा' सहकारी जबरदस्त फॉर्मात

आयपीएल (IPL 2021) स्पर्धा संपत आली असतानाच टी20 वर्ल्ड कपचं (T20 World Cup 2021) काऊंटडाऊन सुरू झालं आहे. हा वर्ल्ड कप जिंकण्याची योजना बनवत असलेल्या विराटसाठी (Virat Kohli) एक चांगली बातमी आली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 8 ऑक्टोबर : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) स्पर्धा संपत आली असतानाच टी20 वर्ल्ड कपचं (T20 World Cup 2021) काऊंटडाऊन सुरू झालं आहे. टीम इंडियाची या स्पर्धेतील पहिली मॅच ही पाकिस्तान विरुद्ध 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टनसीमध्ये होणारी ही टीम इंडियाची शेवटची T20 स्पर्धा आहे. हा वर्ल्ड कप जिंकण्याची योजना बनवत असलेल्या विराटसाठी आयपीएलमधून एक चांगली बातमी आली आहे.

पंजाब किंग्जचं (Punjab Kings) स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं असलं तरी त्यांचा कॅप्टन केएल राहुल (KL Rahul) सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. राहुलनं चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध 98 रनची आक्रमक खेळी केली. या खेळीमुळे सर्वाधिक रन काढण्यासाठी देण्यात येणाऱ्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीमध्ये राहुल आघाडीवर आहे. त्यानं या आयपीएल सिझममध्ये 13 मॅचमध्ये 626 रन केले, यामध्ये 4 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. राहुलनं ऑरेंज कॅपच्या शर्यतीत चेन्नईचे ओपनिंग बॅटर फाफ ड्यू प्लेसी (Faf Du Plessis) आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांना मागे टाकलं आहे.

ORANGE CAP:

पंजाबने दिलेल्या 135 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना केएल राहुलने आक्रमक बॅटिंग केली. राहुल 42 बॉलमध्ये 98 रनवर नाबाद राहिला, त्याच्या या खेळीमध्ये 8 सिक्स आणि 7 फोरचा समावेश होता. चेन्नईचं आव्हान पंजाबला 14 ओव्हरमध्ये पूर्ण करायचं होतं, तरचं पंजाब नेट रनरेटमध्ये मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) पुढे जाणार होती. केएल राहुलच्या वादळी खेळीमुळे पंजाबने हे आव्हान 13 ओव्हरमध्येच पूर्ण केलं.

IPL 2021 : Mumbai Indians Play Off मध्ये पोहोचणार? रोहितसाठी आशेचा शेवटचा किरण

आयपीएलच्या सलग चौथ्या सिझनमध्ये राहुलनं 575 पेक्षा जास्त रन केले आहेत. हा विक्रम करणारा तो पहिलाच बॅटर आहे. ख्रिस गेल (Chris Gayle) आणि डेव्हिड वॉर्नर (David Warner) यांनी तीन सिझनमध्ये 575 पेक्षा जास्त रन केले होते. पंजाबच्या कॅप्टननं 2018 साली 659, 2019 मध्ये 593 आणि 2020 मध्ये 670 रन केले होते.

First published:

Tags: IPL 2021, Kl rahul, T20 world cup