आर. अश्विनला (R Ashwin) टीममध्ये ऑफ स्पिनर म्हणून स्थान देण्यात आलं आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या या बॉलरला यंदाच्या आयपीएलमध्ये फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. आयपीएलच्या दुसऱ्या राऊंडमध्ये अश्विनने 5 सामन्यांमध्ये फक्त 4 विकेट घेतल्या आहेत. फॉर्मच्या हिशोबाने बुमराह, शमी, अक्षर आणि वरुण यांचं वर्ल्ड कपमध्ये खेळणं निश्चित मानलं जात आहे, त्यामुळे अश्विनला प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर ठेवलं जाऊ शकतं.
टीम इंडियामध्ये निवड झालेले राहुल चहर (Rahul Chahar) आणि भुवनेश्वर कुमारही (Bhuvneshwar Kumar) फॉर्ममध्ये नाहीत. चहरने आयपीएलच्या दुसऱ्या राऊंडमध्ये 4 मॅच खेळून 2 विकेट मिळवल्या. खराब फॉर्ममुळे त्याला मुंबईने टीमबाहेरही बसवलं आहे. तर भुवनेश्वर कुमारने या मोसमात 10 मॅचमध्ये फक्त 5 विकेट घेतल्या आहेत.