मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: 'धोनी 'या' खेळाडूचा वर्ल्ड कप टीममध्ये समावेश करण्याची सूचना करणार'

IPL 2021: 'धोनी 'या' खेळाडूचा वर्ल्ड कप टीममध्ये समावेश करण्याची सूचना करणार'

यूएईमध्ये सुरु असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) स्पर्धेच्या दरम्यान टी20 वर्ल्ड कपसाठी (ICC T20 World Cup 2021) निवडण्यात आलेल्या खेळाडूंची चर्चा सुरू आहे.

यूएईमध्ये सुरु असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) स्पर्धेच्या दरम्यान टी20 वर्ल्ड कपसाठी (ICC T20 World Cup 2021) निवडण्यात आलेल्या खेळाडूंची चर्चा सुरू आहे.

यूएईमध्ये सुरु असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) स्पर्धेच्या दरम्यान टी20 वर्ल्ड कपसाठी (ICC T20 World Cup 2021) निवडण्यात आलेल्या खेळाडूंची चर्चा सुरू आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 6 सप्टेंबर : यूएईमध्ये सुरु असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) स्पर्धेच्या दरम्यान टी20 वर्ल्ड कपसाठी (ICC T20 World Cup 2021) निवडण्यात आलेल्या खेळाडूंची चर्चा सुरू आहे. इशान किशन, सूर्यकुमार यादव, वरुण चक्रवर्ती हे खेळाडू आयपीएलनंतर वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार आहेत. तर शार्दुल ठाकूर, दीपक चहर, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल यांचा अंतिम 15 जणांमध्ये समावेश नाही. बीसीसीआयला या टीममध्ये बदल करण्याची संधी 10 ऑक्टोबरपर्यंत आहे.

बीसीसीआयनं अद्याप टीममध्ये बदल करण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत. तरीही क्रिकेट फॅन्स आणि एक्स्पर्ट्स यांनी टीममधील संभाव्य बदलाबाबत मत व्यक्त केलं आहे. इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉन (Michael Vaughan) याने चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) फास्ट बॉलर शार्दुल ठाकूरचा (Shardul Thakur) टीममध्ये समावेश करण्यात येईल असा अंदाज व्यक्त केला आहे.

टीम इंडियाचा मेंटॉर महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) शार्दुलचा समावेश करण्याची सूचना कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना करेल, असा अंदाज वॉननं व्यक्त केला आहे. वॉननं 'क्रिकबझ' शी बोलताना हा अंदाज व्यक्त केला आहे.

T20 World Cup : टीम इंडियाच्या जखमी खेळाडूच्या जागेवर 'या' बॉलरला मिळू शकते संधी

'भारतीय क्रिकेट टीमचा मेंटॉर स्टंपच्या मागं आहे. तो सीएसकेचा कॅप्टन आहे. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी तो शास्त्री आणि कोहलीला याबाबतची  सूचना करेल.' असे वॉनने सांगितले. शार्दुल ठाकूरनं दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध केलेल्या जबरदस्त कामगिरीनंतर वॉननं हे मत व्यक्त केलं आहे.

IPL 2021: रोहित शर्माची अचूक चाल, T20 World Cup पूर्वी टीम इंडियाला Good News

वॉननं ठाकूरची तुलना इंग्लंडचा ऑल राऊंडर इयान बोथमशी केली आहे. 'शार्दुल ठाकूरचा खेळ बराचसा इयान बोथमसारखा आहे. तो बॉलच्या मदतीनं अपेक्षित गोष्ट करु शकतो. टेस्ट क्रिकेटमध्येही त्यानं हेच केलं. आयपीएलमध्येही तो हे काम करत आहे. शार्दुलकडं प्रतिस्पर्ध्याला फसवण्याची क्षमता आहे. त्याच्याकडं फसवी गती आहे. तो खाली वाकला हे पाहून तो सामान्य गतीनं बॉल टाकतोय, असं वाटतं. पण त्यानं समोरचा फसतो. त्यानं अशा एका फसव्या बॉलवर अश्विनला आऊट केलं.' असं ठाकूरनं सांगितलं.

First published:

Tags: IPL 2021, MS Dhoni, Shardul Thakur