मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup: पाकिस्तानच्या पराभवानंतर हसन अलीनं सोडलं मौन, झालेल्या चुकीबद्दल म्हणाला...

T20 World Cup: पाकिस्तानच्या पराभवानंतर हसन अलीनं सोडलं मौन, झालेल्या चुकीबद्दल म्हणाला...

टी20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये (T20 World Cup 2021) पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. या पराभवाला फास्ट बॉलर हसन अली (Hasan Ali) जबाबदार असल्याची टीका फॅन्सनी केली होती

टी20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये (T20 World Cup 2021) पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. या पराभवाला फास्ट बॉलर हसन अली (Hasan Ali) जबाबदार असल्याची टीका फॅन्सनी केली होती

टी20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये (T20 World Cup 2021) पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. या पराभवाला फास्ट बॉलर हसन अली (Hasan Ali) जबाबदार असल्याची टीका फॅन्सनी केली होती

मुंबई, 14 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये (T20 World Cup 2021) पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. या पराभवाला फास्ट बॉलर हसन अली (Hasan Ali) जबाबदार असल्याची टीका फॅन्सनी केली होती. हसननं मॅथ्यू वेडचा (Matthew Wade) कॅच सोडल्यानंच हा पराभव झाल्याचा ठपका पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमनं (Babar Azam) देखील ठेवला. त्यानंतर ट्रोलर्स हसनच्या मागे लागले आहेत. या सर्व प्रकारावर हसननं अखेर मौन सोडलं आहे.

पाकिस्ताननं सुपर 12 मधील सर्व मॅच जिंकत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता. विजेतेपदाच्या प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या पाकिस्ताननं सेमी फायनलमध्ये पहिल्यांदा बॅटींग करताना 4 आऊट 176 रन केले होते. 177 रनचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची अवस्था 5 आऊट 96 अशी झाली होती. त्यानंतर वेड आणि मार्कस स्टॉयनिस जोडीनं मॅचचं चित्र पालटलं.

हसन अलीनं या मॅचमध्ये निराशाजनक कामगिरी केली. त्यानं 4 ओव्हर्समध्ये 44 रन दिले. त्यानंतर 19 व्या ओव्हरमध्ये वेडचा कॅच सोडला. या खराब कामगिरीवर हसननं इमोशल पोस्ट शेअर केली आहे. 'माझी कामगिरी अपेक्षेनुसार झाली नसल्यानं तुम्ही सर्व जण निराश आहात, हे मला माहिती आहे. पण तुम्ही माझ्यापेक्षा जास्त निराश नाहीत. माझ्याकडून तुमच्या असलेल्या अपेक्षा कमी करू नका. मला सर्वोच्च स्तरावर पाकिस्तान क्रिकेटची सेवा करायची आहे. त्यासाठी मी कठोर परिश्रम करून पुनरागमन करेन. सर्व मेसेज, फोन कॉल, ट्विट्स आणि आशिर्वादासाठी धन्यवाद.'

हसन अलीनं या वर्ल्ड कपमधील 6 मॅचमध्ये 5 विकेट्स घेतल्या. टीम इंडिया विरुद्ध त्यानं 44 रन देऊन 2 विकेट्स घेतल्या होत्या. आता फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाची लढत न्यूझीलंडशी (Australia vs New Zealand) होणार आहे.

T20 World Cup Final: स्पर्धेपूर्वी मिळालेल्या वागणुकीचा बदला घेणार, ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनचा इशारा

First published:
top videos

    Tags: Australia, Pakistan, T20 world cup