मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: ऑस्ट्रेलियन कॅप्टनची वॉर्नरबद्दलची भविष्यवाणी खरी, 2 महिन्यांपूर्वी म्हणाला होता...

T20 World Cup: ऑस्ट्रेलियन कॅप्टनची वॉर्नरबद्दलची भविष्यवाणी खरी, 2 महिन्यांपूर्वी म्हणाला होता...

टी20 वर्ल्ड कपपूर्वी (T20 World Cup 2021) डेव्हिड वॉर्नरचा (David Warner) क्रिकेट कारकिर्दीमधील खराब काळ सुरू होता. या खराब काळात ऑस्ट्रेलियन कॅप्टननं वॉर्नरबाबत केलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे.

    मुंबई, 15 नोव्हेंबर:  टी20 वर्ल्ड कपपूर्वी (T20 World Cup 2021) डेव्हिड वॉर्नरचा (David Warner) क्रिकेट कारकिर्दीमधील खराब काळ सुरू होता. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात तो अपयशी ठरला. त्यानंतर सनरायझर्स हैदराबादनं (SRH) त्याला टीममधून काढलं होतं. त्याच्या ऑस्ट्रेलियन टीममधील जागेवरही प्रश्न उपस्थित केले होते. वॉर्नरवरचे टीकाकार वाढले असतानाही ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन आरोन फिंच (Aaron Finch) शांत होता. त्यानं दोन महिन्यापूर्वी त्याच्या ओपनिंग पार्टरनरबाबत केलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे. फिंचनं केला खुलासा ऑस्ट्रेलियानं रविवारी टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर फिंचनं याबाबतचा खुलासा केला आहे. फिंचनं सांगितलं की, दोन महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलिया टीमचे कोच जस्टीन लँगरनं फोन करुन वॉर्नरच्या फॉर्मची चिंता व्यक्त केली होती. त्यावेळी मी त्यांना काळजी न करण्याचा सल्ला दिला तसंच त्याच्याबाबत जी भविष्यवाणी केली होती, ती अखेर खरी ठरली आहे. फिंचनं लँगरला सांगितलं होतं की, 'तू काळजी करू नकोस, वॉर्नर 'प्लेअर ऑफ द टुर्नामेंट' बनेल. वॉर्नरची ही भविष्यवाणी रविवारी खरी ठरली आहे. त्याला या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. वॉर्नरनं टी20 वर्ल्ड कपमध्ये 7 इनिंगमध्ये 1 वेळा नाबाद राहात 48.16 च्या सरासरीनं आणि 146.70 च्या स्ट्राईक रेटनं 289 रन केले. यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश होता. T20 World Cup फायनलनंतर शोएब अख्तर नाराज, ICC वर केला गंभीर आरोप ऑस्ट्रेलियाला सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी निर्णायक असलेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या मॅचमध्ये वॉर्नरनं नाबाद 89 रन काढले. तो त्याचा या स्पर्धेतील सर्वोच्च स्कोअर होता. वॉर्नरच्या या खेळीमुळे ऑस्ट्रेलियानं वेस्ट इंडिजचा पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सेमी फायनलमध्ये त्यानं पाकिस्तान विरूद्ध 49 रनची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून या मॅचमध्येही सर्वाधिक रन वॉर्नरनं काढले. तर फायनलमध्ये त्यानं . त्यानं 38 बॉलमध्ये 4 फोर आणि 3 सिक्स लगावत 53 रन काढले. या खेळीमुळे वॉर्नरला 'प्लेयर ऑफ द टुर्नामेंट' पुरस्कारानं गौरवण्यात आले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Australia, David warner, T20 world cup

    पुढील बातम्या