दुबई, 11 नोव्हेंबर : सुपर-12 च्या पाचही मॅच जिंकलेल्या पाकिस्तानला टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये (T20 World Cup Semi Final) पराभवाचा धक्का बसला आहे. शेवटच्या दोन ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला (Australia vs Pakistan) विजयासाठी 22 रनची गरज होती, तेव्हा मॅथ्यू वेडने (Mathew Wade) शाहिन आफ्रिदीला लागोपाठ तीन सिक्स मारत एक ओव्हर शिल्लक असतानाच ऑस्ट्रेलियाला जिंकवलं. मॅथ्यू वेडने 17 बॉलमध्ये 41 रन केले, यामध्ये 4 सिक्स आणि 2 फोरचा समावेश होता. मार्कस स्टॉयनिसने (Marcus Stoinis) 31 बॉलमध्ये 40 रनची खेळी केली. डेव्हिड वॉर्नरने 30 बॉलमध्ये 49 रन केले. पाकिस्तानकडून शादाब खानला 4 आणि शाहिन आफ्रिदीला 1 विकेट मिळाली. पाकिस्तानचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने टी-20 वर्ल्ड कपची फायनल गाठली आहे. आता रविवारी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. फखर झमानने (Fakhar Zaman) केलेल्या फटकेबाजीमुळे पाकिस्तानने टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup Semi Final सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला (Australia vs Pakistan) 177 रनचं आव्हन दिलं फखर झमानने 32 बॉलमध्ये नाबाद 55 रन केले, यामध्ये 3 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी पाकिस्तानला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी 10 ओव्हरमध्ये 71 रनची पार्टनरशीप केली. बाबर आझम 39 रन तर मोहम्मद रिझवान 67 रन करून आऊट झाले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने 2 विकेट घेतल्या, तर पॅट कमिन्स आणि एडम झम्पाला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: T20 world cup