• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • India vs Pakistan: टीम इंडियाच्या पराभवानं डिप्रेशन आलंय? 'हे' 5 उपाय करतील तुम्हाला नॉर्मल

India vs Pakistan: टीम इंडियाच्या पराभवानं डिप्रेशन आलंय? 'हे' 5 उपाय करतील तुम्हाला नॉर्मल

T20 World Cup 2021: पाकिस्ताननं पहिल्या मॅचमध्ये टीम इंडियाचा 10 विकेट्सनं पराभव केला. (Pic AP)

T20 World Cup 2021: पाकिस्ताननं पहिल्या मॅचमध्ये टीम इंडियाचा 10 विकेट्सनं पराभव केला. (Pic AP)

टीम इंडियाचा पाकिस्तान विरुद्ध पराभव झाल्यानं तुमची चिडचिड झाली असेल, तुम्हाला संताप आला असेल किंवा रात्री झोप लागली नसेल तर ही बातमी नक्की वाचा. Sports Fan Depression हा एक आजार आहे. तुमच्यामध्ये याची लक्षण असू शकतात.

 • Share this:
  मुंबई, 25 ऑक्टोबर : टीम इंडियाच्या  सर्व फॅन्ससाठी टी20 वर्ल्ड कपची सुरूवात निराशाजनक झाली आहे. या मॅचमध्ये (India vs Pakistan) पाकिस्ताननं टीम इंडियाचा 10 विकेट्स आणि 13 बॉल राखून पराभव केला. या पराभवाबरोबरच वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाची विजयी परंपरा तुटली आहे.  1992 पासून ही परंपरा सुरू होती. वन-डे वर्ल्ड कपमधील 7 आणि T20 वर्ल्ड कपमधील 5 मॅच अशा सलग 12 मॅच जिंकल्यानंतर टीम इंडियाचा 13 व्या मॅचमध्ये पहिला पराभव झाला आहे. या पराभवानंतर तुमची चिडचिड झाली असेल, तुम्हाला संताप आला असेल किंवा रात्री झोप लागली नसेल तर ही बातमी नक्की वाचा. Sports Fan Depression  हा एक आजार आहे. तुमच्यामध्ये याची लक्षण असू शकतात. पण, यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. या आजारातून बाहेर पडण्याच्या 5 सोप्या स्टेप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अमेरिकेतील प्रसिद्ध कौन्सिलर अँटोनी सेंटॉर यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये या आजाराबाबत सविस्तर माहिती दिली असून त्यामधून बाहेर पडण्याचे मार्ग सांगितले आहेत. एक पाऊल मागे या मोठ्या मॅचची वातावरण निर्मिती देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. तुमची मित्रमंडळी तसेच अन्य सर्व नेटवर्कमध्ये त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होते. त्यामुळे ही मॅच म्हणजे आयुष्यातील खूप मोठी घटना असल्याची भावना निर्माण होते. त्यामुळेच आवडत्या टीमचा पराभव हा वेदानादायी वाटू लागतो. पण लक्षात ठेवा हा फक्त एक खेळ आहे. तुमच्या आयुष्यातील 99.99 टक्के घटनांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे एक पाऊल मागे या. या पराभवाचा व्यापक अँगलनं विचार करा आणि तुमच्या उर्वरित कामांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही, याची काळजी घ्या सर्वांच्या सोबत राहा डिप्रेशन आलेल्या व्यक्तींचा एकटं राहण्याकडे कल असतो. ते इतरांमध्ये मिसळत नाहीत. ही खूप मोठी चूक आहे. क्रीडा स्पर्धांमुळे अनेकदा तुमचे बाहेर जाण्याचे, मित्र-मंडळींमध्ये मिसळण्याचे वेळापत्रक बिघडलेले असते. या गोष्टी बंद करु नका. त्या पुन्हा एकदा सुरू करा. मित्रांशी, जवळच्या व्यक्तींना भेटा. त्यांच्या संपर्कात राहा एकटं राहिल्यानं अनेकदा गोष्टी बिघडतात. त्यामुळे एकटं राहण्याची चूक कधीही करू नका. कुछ खास है हम सभी में..! सामना गमावला, पण मन जिंकलं, पाकिस्तानीही झाले किंग कोहलीचे 'जबरा फॅन' रिकामं राहू नका एखादी मोठी स्पर्धा संपली की तुमच्या आयुष्यात एक प्रकारचं रितेपण येतं. आपल्याकडं खूप सारा वेळ शिल्लक आहे, असं जाणवतं. हा रिकामा वेळ सत्करणी लागेल याची काळजी घ्या. मित्रमंडळींसोबत फिरायला जा. परिचित व्यक्तींना घरी जेवायला बोलवा. आवडत्या गोष्टींचं वाचन किंवा लेखन करा अथवा एखादा वेगळा खेळ पाहणे सुरू करा. या किंवा तुम्हाला आवडणाऱ्या अन्य कोणत्याही गोष्टींच्या माध्यमातून तुमचा कोणताही वेळ रिकामा राहणार नाही, याची काळजी घ्या. इतरांशी बोला एखादी मॅच हरल्यानंतर त्या मॅचबद्दल बोलणे टाळू नका. तर इतर फॅन्सशी तुमच्या भावना शेअर करा. त्यामधून तुम्ही एकटेच या प्रकाराची निराशा सहन करत नाहीत, हे तुमच्या लक्षात येईल. त्यामधून आपोआप तुमच्या मनातील पराभवाबद्दलचा विचार कमी होईल आणि पुढच्या वर्षी तुमची टीम जोरदार कमबॅक करेल हा विश्वास तुम्हाला वाटू लागेल. T20 World Cup : India vs Pakistan सामन्यानंतरची खरी Story, मैदानात काय झालं पाहा खबरदारी घ्या आवडती टीम हरल्यानं कामात लक्ष न लागणे, निराश वाटणे यासारख्या गोष्टी सहसा फार काळ टिकत नाहीत. काही दिवसांनी ही परिस्थिती नॉर्मल होते. सामान्य परिस्थितीमध्ये या प्रकारच्या लक्षणं जास्तीत जास्त 14 दिवस टिकतात. त्यानंतरही तुमच्या मनातील निराशा कायम असेल तर तुम्हाला कदाचित  Sports Fan Depression हा आजार झालेला असू शकतो. त्यामुळे तातडीने तुमच्या कौन्सिलरशी संपर्क करा आणि त्यांच्या मदतीनं त्यामधून बाहेर पडण्याची प्रक्रिया तातडीनं सुरू करा.
  Published by:News18 Desk
  First published: