मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup, IND vs PAK : 13-0 नाही 12-1, अखेर पाकिस्तानने भारतावर मिळवला विजय!

T20 World Cup, IND vs PAK : 13-0 नाही 12-1, अखेर पाकिस्तानने भारतावर मिळवला विजय!

वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर (India vs Pakistan) विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं.

वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर (India vs Pakistan) विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं.

वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर (India vs Pakistan) विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं.

  • Published by:  Shreyas

दुबई, 24 ऑक्टोबर : वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर (India vs Pakistan) विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर आझम (Babar Azam) 51 बॉलमध्ये नाबाद 66 रनवर आणि मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) 55 बॉलमध्ये नाबाद 79 रनवर नाबाद राहिला. याआधी टी-20 वर्ल्ड कपच्या 5 मॅचमध्ये आणि वनडे वर्ल्ड कपच्या 7 मॅचमध्ये पाकिस्तानला कधीच भारताचा पराभव करता आला नव्हता. पाकिस्तानचा टी-20 क्रिकेटमधला हा पहिलाच 10 विकेटचा विजय आहे,तसंच भारताने कधीही 10 विकेटने टी-20 मॅच गमावली नव्हती.

पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 वर्ल्ड कपच्या सामन्यात विराट कोहलीच्या (Virat Kohli) अर्धशतकाने टीम इंडियाला वाचवलं. या सामन्यात भारताने पाकिस्तानला (India vs Pakistan) विजयासाठी 152 रनचं आव्हान दिलं. भारताला 20 ओव्हरमध्ये 151/7 एवढा स्कोअर करता आला. टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतल्यानंतर शाहिन आफ्रिदीने रोहित शर्मा आणि केएल राहुलच्या रुपात भारताला पहिले दोन धक्के दिले, यानंतर हसन अलीने सूर्यकुमार यादवला आऊट केलं. पण विराटने ऋषभ पंतच्या मदतीने भारताच्या इनिंगला आकार दिला. ऋषभ पंतने 30 बॉलमध्ये 39 रन केले. विराट कोहली 49 बॉलमध्ये 57 रन करून आऊट झाला. शाहिन आफ्रिदीने 4 ओव्हरमध्ये 31 रन देऊन तीन विकेट घेतल्या. आफ्रिदीने रोहित, राहुल आणि विराटला आऊट केलं, तर हसन अलीला 2 विकेट घेण्यात यश आलं.

भारताविरुद्धच्या महामुकाबल्यात पाकिस्तानचा (India vs Pakistan) कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) या सामन्यात आर.अश्विनऐवजी मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीला (Varun Chakravarthy) टीममध्ये संधी दिली.

भारत दुसऱ्या ग्रुपमध्ये

यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान दुसऱ्या ग्रुपमध्ये आहेत. या दोन टीमसह या ग्रुपमध्ये न्यूझीलंड, अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबिया या टीम आहेत. या ग्रुपमधल्या टॉप-2 टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील.

भारताचे वेळापत्रक (Team India Schedule)

31 ऑक्टोबर- भारत विरुद्ध न्यूझीलंड सायंकाळी 7: 30 वाजता

3 नोव्हेंबर- भारत विरुद्ध अफगाणिस्तान सायंकाळी 7: 30 वाजता

5 नोव्हेंबर- भारत विरुद्ध स्कॉटलंड सायंकाळी 7: 30 वाजता

8 नोव्हेंबर- भारत विरुद्ध नामिबिया सायंकाळी 7: 30 वाजता

First published:

Tags: Babar azam, India vs Pakistan, T20 world cup, Virat kohli