मुंबई, 11 फेब्रुवारी: वेस्ट इंडिज विरूद्धच्या वन-डे आणि टी20 सीरिजनंतर श्रीलंकेची टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. दोन्ही देशांमध्ये (India vs Sri Lanka) 2 टेस्टची सीरिज होणार आहे. या सीरिजमध्ये 37 वर्षांचा विकेटकिपर ऋद्धीमान साहाला (Wriddhiman Saha) संधी मिळणार नाही. मीडिया रिपोर्टनुसार निवड समितीच्या सदस्यांनी याबाबतची कल्पना साहाला दिली आहे. त्यानंतर साहानं बंगालच्या रणजी टीममधून माघार घेतली. साहाला या पद्धतीनं टीममधून वगळण्यात येण्याच्या बातमीवर टीम इंडियाचे माजी विकेटकिपर सय्यद किरमाणी (Syed Kirmani) नाराज आहेत. त्यांनी साहाची जोरदार प्रशंसा केली असून त्याचे योगदान कायम स्मरणात राहील असे मत व्यक्त केले आहे. ते ‘मिड-डे’ या वृत्तपत्राशी बोलत होते. किरमाणी यांनी यावेळी सांगितले कि, ‘साहा चांगला विकेटकिपर आहे, यामध्ये कोणतीही शंका नाही. पंत आक्रमक बॅटर आहे, त्यामुळे त्याला जास्त संधी मिळत आहे. 37 व्या वर्षी देखील साहा बेस्ट विकेट किपर आहे. त्यानं निराश होण्याची गरज नाही. दिनेश कार्तिक आणि पार्थिव पटेल यांनाही याच पद्धतीनं वगळण्यात आले. साहाने गेल्या काही वर्षात टीम इंडियासाठी जोरदार खेळ केला आहे. तो एका खास ग्रुपचा सदस्य नव्हता म्हणून त्याला वगळण्यात येत आहे. तो राजकारणाचा बळी ठरलाय. माझ्यासाठी तो नेहमीच एक चांगला विकेटकिपर असेल,’ असे किरमाणी यांनी सांगितले. IND vs WI, 3rd ODI : शिखर धवनचा समावेश नक्की, पाहा दोन्ही टीमची संभाव्य Playing 11 12 वर्षांमध्ये 40 टेस्ट साहाने 2010 साली टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यावेळी महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) टीममध्य्ये होता. त्यामुळे साहाची जागा निश्चित नव्हती. धोनी निवृत्त झाल्यानंतर साहाला काही वर्ष संधी मिळाली. पण, त्यानंतर त्याला ऋषभ पंतकडून आव्हान मिळाले. पंतला आक्रमक बॅटींगमुळे निवड समितीनं पसंती दिली आणि तो विदेशातील टीमचा पहिल्या क्रमांकाचा विकेटकिपर बनला. साहानं आजवर 12 वर्षांमध्ये 40 टेस्ट खेळल्या आहेत. यामध्ये त्याने 29 च्या सरासरीनं 1353 रन काढले आहेत. त्यानं टेस्ट करिअरमध्ये 3 शतक आणि 6 अर्धशतक झळकावली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.