मुंबई, 11 फेब्रुवारी : भारत विरूद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील तिसरी आणि शेवटची वन-डे आज (शुक्रवार) होणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) पूर्णवेळ कॅप्टन झाल्यानंतर टीम इंडियाची ही पहिलीच वन-डे सीरिज आहे. या सीरिजमध्ये भारतीय टीमनं दमदार खेळ करत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता तिसऱ्या आणि शेवटच्या वन-डेमध्ये टीम इंडियात काही बदल होणार आहेत.
अनुभवी ओपनर शिखर धवन (Shikhar Dhawan) कोरोनातून बरा झाला आहे. तो प्लेईंग 11 मध्ये खेळणार हे नक्की आहे. श्रेयस अय्यर टीम प्रॅक्टीसमध्ये सहभागी झाला होता. त्याला शेवटच्या मॅचमध्ये संधी मिळते का हे देखील पाहावे लागले. त्याचबरोबर कुलदीप यादवला सीरिजमधील शेवटच्या मॅचमध्ये संधी मिळू शकते.
वेस्ट इंडिज टीमचा कॅप्टन कायरन पोलार्ड (Kieron Pollard) खराब फिटनेसमुळे दुसऱ्या मॅचमध्ये खेळू शकला नव्हता. त्याला या मॅचमध्येही विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. पोलार्डच्या जागी ओडियन स्मिथला आणखी एक संधी मिळू शकते. त्याने दुसऱ्या वन-डेमध्ये चांगली कामगिरी केली होती.
IPL Auction 2022 : राजस्थान रॉयल्स लिलावासाठी सज्ज, संजूनं सांगितला टीमचा प्लॅन
दोन्ही टीमच्या संभाव्य Playing 11
टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शिखर धवन, विराट कोहली, ऋषभ पंत, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल/कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा.
वेस्ट इंडिज : ब्रँडन किंग, शाई होप, डॅरेन ब्राव्हो, शामार ब्रूक्स, निकोलस पूरन (कॅप्टन), जेसन होल्डर, अकील हुसेन, फॅबियन अॅलेन, ओडियन स्मिथ, अल्झारी जोसेफ आणि केमार रोच
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Shikhar dhavan, Team india