मुंबई, 20 मार्च : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाला (Suresh Raina) यंदाच्या आयपीएल ऑक्शनमध्ये (IPL Auction 2022) कोणत्याही टीम्सनी खरेदी केले नाही. रैना आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या सिझनपासून चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) टीमचा सदस्य होता. या स्पर्धेत सर्वाधिक रन काढणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याचा समावेश आहे. ‘मिस्टर आयपीएल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रैनाला या ऑक्शनपूर्वी सीएसकेने रिटेन केले नव्हते. ऑक्शनमध्येही त्याला एकाही टीमनं खरेदी केले नाही. रैनामध्ये आयपीएल टीम्सनी रस दाखवला नसला तरी त्याची जगभरात लोकप्रियता कायम आहे. रैनाच्या या लोकप्रियतेची दखल मालदिव सरकारनं (Maldives Government) घेतली आहे. मालदीव सरकारनं मालदीव स्पोर्ट्स अवॉर्ड 2022 अंतर्गत प्रतिष्ठेच्या ‘स्पोर्ट्स आयकॉन’ पुरस्कारानं रैनाचा सन्मान केला आहे. रैनाला रियाल माद्रिदचा माजी फुटबॉलपटू रॉबर्टो कार्लोस, जमेकाचा धावपटू असाफा पॉवेल, श्रीलंकेचा माजी कॅप्टन सनथ जयसूर्या यांच्यासह 16 आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर या पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं.
Thank you for the honour Honourable @ibusolih and Mr @AhmedMahloof. The feeling of representing India 🇮🇳 on a global platform among all the world champions is unmatchable. Congratulations on organising such an exclusive award ceremony. Way to go 🙌 #MaldivesSportsAwards2022 pic.twitter.com/VPNtIWh03K
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) March 18, 2022
मालदिवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सालिह यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सुरेश रैनानं हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तसंच मालदिवच्या अध्यक्षांचे आभार मानले आहेत. Women’s World Cup : शेवटच्या जोडीनं टाळला इंग्लंडचा पराभव, यजमान टीमचं आव्हान धोक्यात सुरेश रैना 2008 पासून आयपीएल स्पर्धेत खेळला आहे. त्याने 205 मॅचमध्ये 1 शतक आणि 39 अर्धशतकांच्या जोरावर एकूण 5528 रन केले आहेत. तो गुजरात लायन्स या टीमचा कॅप्टनही होता. तो आगामी आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान हिंदीमधून कॉमेंट्री करणार आहे. टीम इंडियाचे माजी हेडकोच रवी शास्त्रींसोबत (Ravi Shastri) तो ही नवी इनिंग सुरू करेल.