मुंबई, 20 मार्च : न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला वर्ल्ड कपमध्ये (Women’s World Cup 2022) आणखी एक थरारक मॅच रविवारी झाली. या मॅचमध्ये गतविजेत्या इंग्लंडनं न्यूझीलंडचा (England Women vs New Zealand Women) 1 विकेटनं पराभव केला. या वर्ल्ड कपमध्ये पहिल्या तीन मॅच गमावल्यानंतर इंग्लंडचं आव्हान धोक्यात आले होते. त्यानंतर या टीमनं स्पर्धेत पुनरागमन केलं आहे. सुरूवातीला भारताला आणि नंतर न्यूझीलंडला पराभूत करत इंग्लंडनं आव्हान कायम ठेवलं आहे. तर दुसरिकडे यजमान न्यूझीलंडचं आव्हान धोक्यात आलंय. त्यांचा सहा मॅचमधील हा चौथा पराभव आहे. या मॅचमध्ये न्यूझीलंडनं पहिल्यांदा बॅटींग केली. त्यांची संपूर्ण टीम 48.5 ओव्हरमध्ये 203 रनवर ऑल आऊट झाली. इंग्लंडनं 47.2 ओव्हरमध्ये 9 विकेट्सचा मोबदल्यात 204 रनचे टार्गेट पूर्ण केले. इंग्लंडची विजयाकडे सहज वाटचाल सुरू होती. पण, शेवटच्या काही ओव्हर्समध्ये ही मॅच चांगलीच रंगतदार झाली.
England beat New Zealand by one wicket in an absolute thriller in Auckland. What a game! 🔥#CWC22 pic.twitter.com/QDMzEALcAb
— ICC (@ICC) March 20, 2022
इंग्लंडच्या 9 पैकी शेवटच्या 4 विकेट्स फक्त 11 बॉलमध्ये पडल्या. त्यामुळे मॅचमध्ये रंगत निर्माण झाली होती. इंग्लंडची अवस्था 5 आऊट 186 वरून 9 आऊट 196 अशी झाली होती. त्यावेळी त्यांच्यावर पराभवाचा धोका वाढला होता. पण, शेवटच्या जोडीनं निश्चयानं खेळ करत टीमला विजय मिळवू दिला. इंग्लंडकडून नॅट सिव्हरनं (Nat Sciver) सर्वात जास्त 61 रन काढले. तिनं 108 बॉलमध्ये हे रन केले. सिव्हरचं हे आजवरील सर्वात संथ अर्धशतक आहे. इंग्लंडची कॅप्टन हेथर नाईटनं 42 रनची खेळी केली. IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सला मोठा दिलासा, प्रमुख खेळाडू मुंबईत दाखल न्यूझीलंडकडून पहिल्यांदा बॅटींग करताना मॅडी ग्रीननं सर्वाधिक 52 रन काढले. तर कॅप्टन सोफी डिव्हाईननं 41 रन केले. या पराभवानंतर न्यूझीलंडची टीम पॉईंट टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावर घसरली आहे. तर इंग्लंडची टीम पाचव्या क्रमांकावर आहे.