सलमानची स्टाईल मारायला गेला आणि झाला ट्रोल! चहलच्या VIRAL फोटोवर रोहितने घेतली फिरकी

सलमानची स्टाईल मारायला गेला आणि झाला ट्रोल! चहलच्या VIRAL फोटोवर रोहितने घेतली फिरकी

ऑस्ट्रेलियाविरोधात वन-डे सीरिज जिंकल्यानंतर रोहित शर्मा मस्तीच्या मूडमध्ये दिसतोय. सोशल मीडियावर त्यानं खास मित्र आणि स्पिनर युजवेंद्र चहलचा फोटो ट्रोल केला.

  • Share this:

मनोरंजन, 21 जानेवारी:  सलमान खानचे शर्टलेस फोटो तुम्ही अनेकदा पाहिले असतील. सलमान खानची बॉडी तुम्ही पाहून आरे वा म्हटलंही असेल. मात्र सलमानची स्टाईल जर कुणी मारण्याचा प्रयत्न केला तर आणि तेही भारतीय टीममधील खेळाडून मारण्याचा प्रयत्न केला तर. टीम इंडियाच्या एका खेळाडूने चक्क सलमान खान याची स्टाईल मारण्याचा प्रयत्न केला आणि तो ट्रोल झाला आहे.

चहलचा शर्टलेस फोटो व्हायरल

भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू युजवेंद्र चहल यानं आपला शर्टलेस फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. या फोटोत चहलनं शर्ट घातलेला नाहीये. दुसरं म्हणजे चहलनं खाद्यावर टॅटू काढले आहे. WWEमधील स्टार द रॉक सारखाचं टॅटू त्यानं खांद्यावर काढला आहे. चहल याची बॉडी नसल्यानं शर्टलेस फोटोत तो सलमान सारखा दिसत नाही. त्यामुळं चहलनं पोस्ट केलेला फोटो ट्रोल झाला आहे.

रोहित शर्माकडून चहलचा फोटो ट्रोल

ऑस्ट्रेलियाविरोधातील वन डे सीरिज जिंकल्यानंतर टीम इंडियाचे हौसले बुलंद झाले आहेत. वन डे सीरिजमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या रोहित शर्मावर क्रिकेट चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होतोय. त्यामुळं रोहित शर्मा मस्तीच्या मूडमध्ये दिसतोय. रोहित शर्मा यानं चहलनं पोस्ट केलेल्या फोटोला ट्रोल केलं आहे. चहलचा शर्टलेस फोटो रोहितनं शेअर करून ट्रोल केलं आहे. चहलच्या फोटोसोबत रोहितनं WWE रेसलर आणि हॉलिवूड अभिनेते द रॉक याचा फोटो शेअर केला आणि खाली कॅप्शन दिलं आज मी खूप शानदार फोटो पाहिला आहे.

<blockquote class="twitter-tweet"><p lang="en" dir="ltr">The rock 😜😂💪 <a href="https://t.co/F1aPLj0pUs">https://t.co/F1aPLj0pUs</a></p>&mdash; Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) <a href="https://twitter.com/yuzi_chahal/status/1219294299763818496?ref_src=twsrc%5Etfw">January 20, 2020</a></blockquote> <script async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script>

रोहितच्या ट्विटला चहलचं उत्तर

रोहित शर्मानं चहलचा फोटो पोस्ट करून त्याला ट्रोलं केलंय. तसेच त्या फोटो खाली कॅप्शनही दिलंय. रोहितच्या ट्रोलच्या पोस्टला चहलनं उत्तर दिलं आहे. 'द रॉक' त्यासह अनेक इमोजी ही चहलनं पोस्ट केल्यात. हॉलिवूड अभिनेता ड्वेन जॉन्सन WWEमध्ये द रॉक नावनं ओळखला जातो.

रोहितनं अनेकदा केली चहलची मस्ती

रोहित शर्मा आणि चहल हे चांगले मित्र आहे. त्यामुळं दोघे एकमेकांची चांगलीच मस्ती करत असतात. या आधाही दोघांनी एकमेकांची चांगलीच मस्ती केल्याचं पाहायला मिळालं होतं. रोहित शर्मानं या आधीही चहलच्या बॉडीची मस्करी केली होती. काही दिवसांपूर्वी एका टीव्ही कार्यक्रमात चहलनं रोहित शर्माला सिक्सर मारण्यासाठी बॉडीची गरज आहे का असा प्रश्न विचारला होता. त्यावर रोहितनं सिक्सर मारण्यासाठी बॉडीची गरज असल्याचं सांगितलं होतं. बॉडी असल्यानं लांब सिक्सर मारता येतो का असा प्रश्न नंतर चहलनं रोहितला विचारला होता. त्यावर रोहितनं हो, बॉडी असेल तर लांब सिक्सर मारता येत असल्याचं उत्तर दिलं होतं.

हेही वाचा- गोलंदाजाचा कहर! 175 किमी वेगाने चेंडू टाकत मोडला अख्तरचा वर्ल्ड रेकॉर्ड?

'ती घटना फक्त रोहितला माहिती', प्रवीण कुमारचा आणखी एक धक्कादायक खुलासा

ऑस्ट्रेलियाच्या मदतीसाठी धावून आला सचिन! आता थेट होणार कोच

First published: January 21, 2020, 4:15 PM IST

ताज्या बातम्या