Home /News /sport /

मैदानात पुन्हा एकदा दिसणार सौरव गांगुलीची 'दादागिरी', BCCI च्या बैठकीपूर्वी होणार सामना

मैदानात पुन्हा एकदा दिसणार सौरव गांगुलीची 'दादागिरी', BCCI च्या बैठकीपूर्वी होणार सामना

बीसीसीआयची (BCCI) वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) अहमदाबादमध्ये (Ahmedabad) होणार आहे. या बैठकीत भारतीय क्रिकेटसंबंधी अनेक मोठे निर्णय अपेक्षित आहेत. या निमित्तानं सौरव गांगुली (Sourav Ganguly) पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे.

    अहमदाबाद, 23 डिसेंबर : सौरव गांगुलीची (Sourav Ganguly) एक आक्रमक बॅट्समन आणि कॅप्टन अशी क्रिकेट विश्वाला ओळख आहे. गांगुलीच्या खेळाचा आजही क्रिकेट फॅन्सवर मोठा प्रभाव आहे. गांगुली बीसीसीआयचा (BCCI) अध्यक्ष झाल्यापासून त्याच्याकडून पुन्हा एकदा ‘दादागिरी’ची क्रिकेट फॅन्सना अपेक्षा असते. बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) 24 डिसेंबर रोजी अहमदाबादमध्ये होणार आहे. या बैठकीत भारतीय क्रिकेटसंबंधी अनेक मोठे निर्णय अपेक्षित आहेत. या निमित्तानं गांगुली पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. गांगुली का उतरणार मैदानात? बीसीसीआयच्या बैठकीच्या दरम्यान अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा (Jay Shah) यांच्या टीमममध्ये एक मित्रत्वाचा सामना होणार आहे. अहमदाबादमधील सरदार पटेल स्टेडियम, मोटेरा मध्ये हा सामना रंगणार आहे. हे स्टेडियम यावर्षीच नव्यानं तयार झाले आहे. या सामन्यासाठी गांगुली मैदानात उतरणार आहे. जगातील सर्वात मोठे स्टेडियम नव्यानं बांधण्यात आलेले सरदार पटेल स्टेडियम हे 63 एकर जागेवर पसरलं आहे. यासाठी 750 कोटींचा खर्च आला आहे. या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता 1 लाख 10 हजार इतकी असून हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. (हे वाचा-IND vs AUS: ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! ‘हा’ दिग्गज खेळाडू दुसऱ्या टेस्टमधूनही आऊट) या स्टेडियमवर अजून एकही मॅच झालेली नाही. त्यामुळे येथील पिचचा अंदाज यावा यासाठी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांमध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात सौरव गांगुलीसह सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निरंजन शहा, कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल आणि हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मोहम्मद अझहरुद्दीन देखील सहभागी होणार आहेत. टेनिस बॉलनं हा सामना होईल. (हे वाचा-IND vs AUS: ठरलं! रोहित शर्मा 'या' तारखेला होणार टीम इंडियात दाखल) डे-नाईट टेस्ट होणार इंग्लंडची टीम फेब्रुवारीमध्ये चार टेस्ट, पाच टी 20 आणि तीन वन-डे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतामध्ये येणार आहे. अहमदाबादमधील सरदार पटेल स्टेडियमवरच भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील तिसरी डे-नाईट टेस्ट होणार आहे. ही टेस्ट 24 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या मालिकेतील चौथी टेस्टही याच स्टेडियमवर 4 ते 8 मार्च दरम्यान होईल. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच टी 20 सामनेही याच ठिकाणी होणार आहे. देशातील कोरोनाच्या (COVID19) परिस्थितीचा विचार करुन हे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BCCI, Cricket, Saurav ganguli

    पुढील बातम्या