Home /News /sport /

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, ‘हा’ दिग्गज खेळाडू दुसऱ्या टेस्टमधूनही आऊट!

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, ‘हा’ दिग्गज खेळाडू दुसऱ्या टेस्टमधूनही आऊट!

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) सीरिजमध्ये 2-0 अशी आघाडी घेण्याच्या तयारीत असलेल्या ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे.

    मेलबर्न, 23 डिसेंबर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) सीरिजमध्ये 2-0 अशी आघाडी घेण्याच्या तयारीत असलेल्या ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा ओपनर डेव्हिड वॉर्नर (David Warner) मेलबर्न टेस्टमधूनही आऊट झाला आहे. मेलबर्नमध्ये 26 डिसेंबरपासून ‘बॉक्सिंग डे टेस्ट’ (Boxing Day Test) सुरु होणार आहे. डेव्हिड वॉर्नर मागच्या महिन्यात भारताविरुद्धच्या वनडे सीरिजदरम्यान दुखापतग्रस्त झाला होता, यानंतर सिडनीमध्येच त्याच्यावर उपचार सुरू होते. सिडनीमध्ये वाढत चालेल्या कोरोना संक्रमणामुळे वॉर्नर प्रायव्हेट जेटने मेलबर्नला दाखल झाला होता. मात्र अजूनही तो दुखापतीमधून पूर्णपणे बरा झालेला नसल्यानं दुसऱ्या टेस्टमधून आऊट झाला आहे. एबॉटही आऊट वॉर्नरप्रमाणेच ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर सीन एबॉटही (Sean Abbot) दुसऱ्या टेस्टमध्ये खेळू शकणार नाही. एबॉट आता दुखापतीमधून बरा झालाय, मात्र अजूनही खबरदारीचा उपाय म्हणून त्याचा टीममध्ये समावेश करण्यात आलेला नाही. वॉर्नरप्रमाणेच एबॉटही वेळेआधी मेलबर्नला गेला होता. या दोघांच्या जागेवर कोणत्याही नव्या खेळाडूचा समावेश होणार नसल्याचं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ( CA) स्पष्ट केले आहे. त्यामुळे मॅथ्यू वेड (Matthew Wade) आणि जो बर्न्स (Joe Burns) ही जोडीच ऑस्ट्रेलियन इनिंगची मेलबर्नमध्ये सुरुवात करेल. (हे वाचा-2020 ची सर्वोत्तम टी-20 टीम, विराट नाही तर या दोन भारतीयांचा समावेश) भारत आणि ऑस्ट्रेलियातील तिसरी टेस्ट 7 जानेवारीपासून सिडनीमध्ये होणार आहे. आता या तिसऱ्या टेस्टसाठी या दोन खेळाडूंचा विचार होणार आहे. डेव्हिड वॉर्नरचा ऑस्ट्रेलियातील रेकॉर्ड जबरदस्त आहे. त्याच्या अनुपस्थितीचा टीम इंडियाला (Team India) फायदा होईल. अजिंक्य रहाणे करणार नेतृत्व भारताचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) पितृत्वाची रजा (Paternity Leave) घेऊन भारतामध्ये परतला आहे. त्यामुळे उर्वरिट टेस्ट सीरिजमध्ये मुंबईकर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. पहिल्या टेस्टमधील मानहानीकारक पराभवानंतर कमबॅक करण्याचं मोठं आव्हान टीम इंडियासमोर आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात रहाणेच्या कॅप्टनसीचा चांगलाच कस लागणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, India vs Australia

    पुढील बातम्या