Home /News /sport /

IND vs AUS: ठरलं! रोहित शर्मा 'या' तारखेला होणार टीम इंडियात दाखल

IND vs AUS: ठरलं! रोहित शर्मा 'या' तारखेला होणार टीम इंडियात दाखल

रोहित शर्माला (Rohit Sharma) आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान दुखापत झाली होती. या दुखापतीमधून बरा झाल्यानंतर रोहित 16 डिसेंबरला सिडनीमध्ये दाखल झाला होता. तो सध्या सिडनीमध्ये दोन आठवड्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत आहे.

    मेलबर्न, 23 डिसेंबर : टीम इंडियाचा (Team India) हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) 30 डिसेंबरला भारतीय टीममध्ये सहभागी होणार आहे. रोहितला आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान दुखापत झाली होती. या दुखापतीमधून बरा झाल्यानंतर तो 16 डिसेंबरला सिडनीमध्ये दाखल झाला होता. रोहित सध्या सिडनीमध्ये दोन आठवड्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत आहे. टीम इंडिया होणार भक्कम! टीम इंडियाकडून पहिल्या टेस्टमध्ये पृथ्वी शॉ (Prithivi Shaw) आणि मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) ही ओपनिंग जोडी मैदानात उतरली होती. पृथ्वी शॉ ने दोन्ही इनिंगमध्ये मिळून फक्त 4 रन काढले. तर मयंक अग्रवालाही फार कमाल करु शकला नाही. त्याने पहिल्या इनिंगमध्ये 17 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 9 रन काढले होते. रोहित शर्माच्या समावेशानं भारतीय टीमच्या सलामीचा प्रश्न सुटणार असून त्याच्या अनुभवामुळे टीम इंडिया भक्कम होणार आहे. रोहितनं मागच्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये डावाची सुरुवात केली होती. सिडनी टेस्टला कोरोनाचा धोका सिडनीमध्ये कोरोना व्हायरसची (Coronavirus ) परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे सिडनीमध्ये होणारी तिसरी टेस्ट देखील मेलबर्नमध्ये होण्याची शक्यता आहे. मेलबर्नमध्ये दुसरी टेस्ट 26 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. तर सिडनीमध्ये 7 ते 11 जानेवारी दरम्यान तिसरी टेस्ट आहे. सिडनीमधील परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर तिथं तिसरी टेस्ट होण्याची शक्यता कमी आहे. (हे वाचा-2020 ची सर्वोत्तम टी-20 टीम, विराट नाही तर या दोन भारतीयांचा समावेश) 'रोहित शर्माला मेलबर्नमध्ये क्वारंटाईन कालावधी पूर्ण करु द्यावा', अशी विनंती बीसीसीआयनं (BCCI ) क्रिकेट ऑस्ट्रेलियाला (CA) केली होती. मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ही विनंती मान्य केली नाही, असं वृत्त ‘क्रिकबझ’ नं दिले आहे. त्यामुळे भारतीय टीम दुसऱ्या टेस्टची तयारी करत असताना रोहित सध्या सिडनीच्या हॉटेलमध्ये आहे. BCCI चं परिस्थितीवर लक्ष सिडनीमध्ये कोरोना पेशंट्सची संख्या (COVID -19) गंभीर असल्यानं तेथील परिस्थितीवर बीसीसीआयचं लक्ष आहे. ‘बीसीसीआय रोहितशी सतत संपर्कात आहे. तो हॉटेलमध्ये सुरक्षित आहे. आवश्यकता भासल्यास रोहितला लगेच सिडनीमधून बाहेर काढले जाईल,’ असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, India vs Australia, Rohit sharma

    पुढील बातम्या