मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /राहुल द्रविडला हेड कोच होण्यासाठी कसे तयार केले? दादाने सांगितली Inside Story

राहुल द्रविडला हेड कोच होण्यासाठी कसे तयार केले? दादाने सांगितली Inside Story

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्या सीरिजपासून राहुल द्रविडने (Rahul Dravid)  टीम इंडियाच्या हेड कोच पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी द्रविड सुरुवातीला तयार नव्हता.

मुंबई, 6 डिसेंबर : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्या सीरिजपासून राहुल द्रविडने (Rahul Dravid)  टीम इंडियाच्या हेड कोच पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. द्रविडने मावळते हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांची जागा घेतली. भारतीय क्रिकेटमधील ही मोठी जबाबदारी स्विकारण्यासाठी द्रविड सुरुवातीला तयार नव्हता. त्याला या पदासाठी कसं तयार केलं याचा गौप्यस्फोट बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी केला आहे.

गांगुलीनं एका मुलाखतीमध्ये द्रविड हेड कोच कसा बनला याची Inside Story सांगितली आहे. 'टीम इंडियाच्या हेड कोच पदासाठी माझ्या आणि जय शहा यांच्या मनात द्रविडचे नाव होते. पण,  घरापासून दीर्घकाळ दूर राहवं लागत असल्यानं द्रविड ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार नव्हता. या कामासाठी त्याला 8 ते 9 महिने घराबाहेर राहावे लागणार होते, द्रविडला दोन मुलं आहेत. त्यामुळे त्याची यासाठी तयारी नव्हती.

एक वेळ अशी आली की आम्ही देखील हार मानली होती. त्याची नॅशनल क्रिकेट अकादमीच्या  (National Cricket Academy) प्रमुखपदी नियुक्ती केली. या पदावर नियुक्ती झाल्यानंतरही आम्ही सातत्यानं त्याच्या संपर्कात होतं. अखेर तो या जबाबदारीसाठी तयार झाला. द्रविडनं त्याचा निर्णय कसा बदलला हे मला माहिती नाही.' असे गांगुलीने क्रीडा पत्रकार बोरिया मजूमदार यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केले आहे.

शुभमन गिल खेळत असताना वानखेडेवर Sachin, Sachin... चा गजर VIDEO

राहुल द्रविड 2015 साली सर्वप्रथम बीसीसीआयच्या कोचिंग सिस्टमचा भाग झाला. त्याने 4 वर्ष इंडिया ए आणि अंडर 19 टीमच्या हेड कोचची जबाबदारी सांभाळली. त्याच्या कार्यकाळात तयार झालेल्या या टीममधील अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्याचबरोबर अंडर 19 टीमनं 2018 साली वर्ल्ड कप देखील जिंकला. 2019 सालापासून द्रविडने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (NCA) प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारली.

First published:
top videos

    Tags: Cricket news, Rahul dravid, Sourav ganguly, Team india