मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ : शुभमन गिल खेळत असताना वानखेडेवर Sachin, Sachin... चा गजर VIDEO

IND vs NZ : शुभमन गिल खेळत असताना वानखेडेवर Sachin, Sachin... चा गजर VIDEO

टीम इंडियाकडून रविवारी शुभमन गिलने (Shubman Gill ) 47 रनची खेळी केली. तो बॅटींग करताना वानखेडे स्टेडियममधील प्रेक्षकांनी सचिन तेंडुलकरच्या (Sachin, Sachin...) नावाचा गजर केला.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 5 डिसेंबर : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात मुंबईमध्ये सुरू असलेल्या टेस्टचा रविवारी तिसरा दिवस आहे. या टेस्टवर टीम इंडियानं मजबूत पकड मिळवली आहे. भारतीय टीमनं दुसरी इनिंग 7 आऊट 276 रनवर घोषीत केली. न्यूझीलंडला ही टेस्ट जिंकण्यासाठी 540 रनचं मोठं आव्हान आहे. या टार्गेटचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरूवात खराब झाली. या मॅचमधील त्यांचा कॅप्टन टॉम लॅथम (Tom Latham) झटपट आऊट झाला. टीम इंडियाकडून रविवारी विराट कोहली (Virat Kohli) आणि शुभमन गिल (Shubman Gill ) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 85 रनची भागिदारी केली. शुभमन तिसऱ्या नंबरवर बॅटींगला आला होता. त्याने विराट कोहलीच्या जोडीनं काही चांगले फटके लगावले. त्यानं या खेळीत 4 फोर आणि 1 सिक्स लगावला. यावेळी शुभमन गिलनं एक फोर लगावल्यानंतर वानखेडे स्टेडियममधील प्रेक्षकांनी सचिन, सचिन (Sachin, Sachin...) असा गजर केला. सारा सोबत जोडले जाते नाव सचिनची मुलगी सारा तेंडुलकरचं (Sara Tenulkar) नाव अनेकदा शुभमन गिल  सोबत जोडले जाते. हे दोघे अनेकदा पार्टी तसंच कार्यक्रमात एकत्र दिसले आहेत. असं असलं तरी अद्याप दोघांपैकी कुणीही अधिकृतपणे या रिलेशनशिपवर कोणतेही मत व्यक्त केलेले नाही. सचिननं दिला सल्ला शुभमन मुंबई टेस्टच्या  दुसऱ्या इनिंगमध्येही अर्धशतकाच्या उंबरठ्यावर (47 रन) आऊट झाला. त्यानं पहिल्या इनिंगमध्ये 44 रन केले होते. शुभमनच्या खेळाबाबत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं खास सल्ला दिला आहे. शुभमनकडे हार्ड आणि उसळत्या पिचवर खेळण्याचा अनुभव आहे. त्याच्या तंत्रामध्ये कोणतीही अडचण नाही. त्यानं चांगली सुरुवात केली आहे. आता त्याचे रुपांतर मोठ्या खेळीत करण्याची वेळ आली आहे. त्याच्यावर शतकासाठी जास्त दबाव टाकण्याची गरज नाही. त्याच्यात मोठा स्कोअर करण्याची इच्छाशक्ती आहे. फक्त त्यानं चांगल्या सुरुवातीचे रुपांतर मोठ्या खेळीत करणे आवश्यक आहे. त्यासाठी एकाग्रता भंग होणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे, असा सल्ला सचिननं दिला होता. IND vs NZ : शुभमन गिल खेळत असताना वानखेडेवर Sachin, Sachin... चा गजर टीम इंडिया या महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात शुभमन सचिनच्या सल्ल्याची अंमलबजावणी करत मोठी खेळी करतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
First published:

Tags: Mumbai, Sachin tendulkar, Team india

पुढील बातम्या