IPl 2021: देवदत्त पडिक्कलनंतर विराटच्या टीममधील आणखी एकाला corona
आयपीएलमधील पहिली मॅच सुरु होण्यासाठी 48 तासांपेक्षाही कमी कालावधी उरला आहे. त्यापूर्वी विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) टीमला आणखी एक धक्का बसला आहे.
चेन्नई, 7 एप्रिल: आयपीएलमधील पहिली मॅच सुरु होण्यासाठी 48 तासांपेक्षाही कमी कालावधी उरला आहे. त्यापूर्वी विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) टीमला आणखी एक धक्का बसला आहे. आरसीबीचा ऑल राऊंडर डॅनियल सॅम्स (Daniel Sams) याची कोरना टेस्ट (COVID-19) पॉझिटिव्ह आली आहे. (RCB all-rounder Daniel Sams has tested positive for COVID-19)आरसीबीनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुनच ही माहिती दिली आहे.
'डॅनियल सॅम्स 3 एप्रिल रोजी चेन्नईतील टीमच्या हॉटेलमध्ये दाखल झाला. त्यावेळी त्याचा कोरोना रिपोर्ट हा निगेटीव्ह होता. त्याच्या दुसऱ्या चाचणीचा रिपोर्ट 7 एप्रिल रोजी मिळाला आहे. त्यामध्ये तो पॉझिटिव्ह आढळला आहे. सध्या तो आयसोलेशनमध्ये असून मेडिकल टीम त्याच्यावर उपचार करत आहे.' असं ट्विट आरसीबीनं केलं आहे.
Official Statement: Daniel Sams checked into the team hotel in Chennai on April 3rd, with a negative COVID report on arrival. His report from the 2nd test on 7th April came positive. Sams is currently asymptomatic and he is currently in isolation at a designated medical facility.
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 7, 2021
यापूर्वी चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) टीमचा ओपनर देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) याला कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं होतं. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर देवदत्त बंगळुरमध्येच घरीच त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. देवदत्त पहिल्या दोन मॅच खेळण्याची शक्यता कमी आहे.
देवदत्त हा आरसीबीचा महत्त्वाचा खेळाडू आहे. मागच्या वर्षी युएईमध्ये त्यानं आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. पहिल्याच सिझनमध्ये त्यानं सर्वांना प्रभावित केलं. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफीतही त्यानं 147. 40 च्या सरासरीनं 737 रन काढले होते. यामध्ये चार सलग शतकांचाही समावेश आहे.
देवदत्त पाठोपाठ डॅनियल सॅम्सला देखील कोरोनाची लागण झाल्यानं आरसीबीच्या कँपमध्ये काळजीचं वातावरण आहे. आरसीबीची पहिली मॅच मुंबई इंडियन्स विरुद्ध 9 एप्रिल रोजी चेन्नईत होणार आहे.
डॅनियल सॅम्स हा कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला आयपीएलमधील चौथा खेळाडू आहे. यापूर्वी टीम इंडियाचा ऑल राऊंडर आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) टीमचा प्रमुख खेळाडू असलेला अक्षर पटेल (Axar Patel) देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) टीमचा बॅट्समन नितीश राणा याला कोरोनाची लागण झाली होती.