ढाका, 09 मार्च : नुकताच लग्नाच्या बेडीत अडकलेल्या क्रिकेटपटूला 3 वर्ष तुरुंगवास भोगावा लागण्याची शक्यता आहे. लग्नाच्या विधीवेळी हरिणाची कातडी वापरल्यानं ही शिक्षा होऊ शकते. बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू सौम्या सरकार नुकताच लग्नाच्या बेडीत अडकला. सध्या तो झिम्बॉब्वेविरुद्ध टी20 मालिकेत खेळत आहे. मात्र त्याच्या खासगी आयुष्यात अडचण निर्माण झाली आहे. त्याच्या वडिलांनाही या प्रकरणात शिक्षा होऊ शकते.
सौम्या सरकारने नुकतंच एका 19 वर्षीय मुलीशी लग्न केलं होतं. यात हरणाच्या कातडीचा वापर लग्नाच्या विधीवेळी करण्यात आला. बांगलादेशच्या वन्यजीव गुन्हे प्रतिबंधक विभागाने याची चौकशी सुरु केली आहे. चौकशीनंतर सौम्या सरकारच्या कुटुंबावर कारवाई होऊ शकते. याबाबत वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, ढाका इथल्या सौम्या सरकारच्या घरी तपास अधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्याचा अहवाल मागवण्यात आला आहे. हरणाची कातडी बाळगणे हा गुन्हा आहे.
बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू सौम्या सरकारचे 21 फेब्रुवारीला लग्न झाले होते. त्यावेळी धार्मिक परंपरेनुसार तो हरणाच्या कातडीवर बसला होता. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर वनविभागाची नजर त्यावर पडली. बांगलादेशमध्ये कोणत्याही जंगली प्राण्याची कातडी बाळगणं कायद्यानं गुन्हा आहे. यात दोषी आढळल्यास 3 वर्षांची शिक्षा होऊ शकते.
हे वाचा : न्यूझीलंड दौऱ्यात टीम इंडियाचा हा क्रिकेटपटू फ्लॉप, आता झळकावलं शतक
याबाबत सौम्या सरकारच्या वडिलांनी सांगितलं की, आमच्या कुटुंबाची ती परंपरा आहे. आम्ही पुजेसाठी हरणाच्या कातडीचा वापर करतो. ही कातडी मला माझ्या वडिलांनी दिली होती आणि त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाली होती.
हे वाचा : WhatsAppवर बोलावं तसं ट्विटरवर चॅट, डिव्हिलियर्सच्या रिप्लायनंतर विराट बसला गप्प मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.